Eknath Shinde | मुंबई, गुजरात, आसामच काय जगात घुमतंय एकनाथ शिंदेंचं नाव, 33 देशात एकच नाव चर्चेत, गूगल सर्चमध्ये तर टॉप!

राज्यातील राजकीय घडामोडीचे केंद्रबिंदू हे गुवाहटीतील रेडीसन ब्लू हे हॅाटेल आहे. गेल्या काही दिवसांपासून हे हॉटेल चर्चेत आले आहे. दिवसेंदिवस शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढतांना दिसते. यावर राज्यात बैठकींचा सपाटा सुरूयं. तसेच शिवसैनिकांची आता बंडखोर खासदार आणि आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड करण्यास सुरूवात केलीयं.

Eknath Shinde | मुंबई, गुजरात, आसामच काय जगात घुमतंय एकनाथ शिंदेंचं नाव, 33 देशात एकच नाव चर्चेत, गूगल सर्चमध्ये तर टॉप!
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 25, 2022 | 4:57 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर संपूर्ण देशाचेच नव्हेतर जगाचेच लक्ष राज्याकडे लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून गुवाहटी येथे एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार हाॅटेलमध्ये (Hotel) वास्तव्यास आहेत. राज्यात रोज वेगवेगळ्या घडामोडी घडतायंत. एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा आता जगभर होताना दिसते आहे. पाकिस्तानात गुगल सर्चिंगमध्ये (Google Search) एकनाथ शिंदे यांचे नाव 54 टक्के सर्वाधिक सर्च केले गेले आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानसह जगातील 33 देशांमध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव टाॅपमध्ये सर्च केले जात आहे. म्हणजेच काय तर राज्याच्या राजकारणाची ही सत्तासंघर्षाची चर्चा देशापुरतीच मर्यादीत न राहता जगभर पोहचलीयं.

पाकिस्तानसह जगातील 33 देशांमध्ये एकनाथ शिंदे यांचे नाव गुगल सर्चमध्ये

राज्यातील राजकीय घडामोडीचे केंद्रबिंदू हे गुवाहटीतील रेडीसन ब्लू हे हॅाटेल आहे. गेल्या काही दिवसांपासून हे हॉटेल चर्चेत आले आहे. दिवसेंदिवस शिंदे गटातील आमदारांची संख्या वाढतांना दिसते. यावर राज्यात बैठकींचा सपाटा सुरूयं. तसेच शिवसैनिकांची आता बंडखोर खासदार आणि आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड करण्यास सुरूवात केलीयं. मुंबईमध्ये 144 लागू करण्यात आलंय. एकंदरीतच काय तर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकार धोक्यात असल्याने मंत्र्यांनी धावपळ सुरू केलीयं.

राज्यात राजकिय घडामोडींना प्रचंड वेग

राज्यात राजकिय घडामोडींना वेग आलायं. याचपार्श्वभूमीवर बांगलादेश, नेपाळ, कॅनडा, सौदी अरेबिया, मलेशिया, जपान, इंडोनेशिया आदी देशांमध्ये भारताचे नाव आणि एकनाथ शिंदे यांचे नाव सर्च केले जातेयं. पाकिस्तानमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाची तर जोरदार चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे 42 पेक्षाही अधिक आमदार हे शिवसेनेचे आहेत, तसेच 8 आमदार हे अपक्ष आहेत. भाजपासोबत मिळून एकनाथ शिंदे गट हा सत्ता स्थापन करणार हे निश्चितच आहे. मात्र, शिवसेनेकडूनही बंडखोर आमदारांवर आता कारवाई केली जातयं.