पार्थची खिल्ली उडवण्यापेक्षा प्रोत्साहन द्या : नितेश राणे

पुणे: पुण्यातील चिंचवडमध्ये रविवारी 17 मार्चला पार्थ पवार यांच्या प्रचारसभेचा नारळ फुटला. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिलं भाषण चिंचवडमध्ये केलं. अवघ्या तीन मिनिटांच्या भाषणात पार्थ पवार बरेच गोंधळलेले दिसले. अनेक वेळा ते गडबडलेही. पार्थ यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. पार्थ पवार यांच्या भाषणावरुन त्यांना केवळ घराणेशाहीमुळेच उमेदवारी […]

पार्थची खिल्ली उडवण्यापेक्षा प्रोत्साहन द्या : नितेश राणे
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

पुणे: पुण्यातील चिंचवडमध्ये रविवारी 17 मार्चला पार्थ पवार यांच्या प्रचारसभेचा नारळ फुटला. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील पहिलं भाषण चिंचवडमध्ये केलं. अवघ्या तीन मिनिटांच्या भाषणात पार्थ पवार बरेच गोंधळलेले दिसले. अनेक वेळा ते गडबडलेही. पार्थ यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

पार्थ पवार यांच्या भाषणावरुन त्यांना केवळ घराणेशाहीमुळेच उमेदवारी मिळाल्याचा आरोप होत आहे. पार्थ यांच्या पहिल्या भाषणावर टीका होत असताना, काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी त्यांची बाजू घेतली आहे.

पार्थ पवार यांच्या भाषणावरुन खिल्ली उडवण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन द्या, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

नितेश राणे काय म्हणाले?

पार्थ पवारच्या पहिल्या भाषणवार खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.. पहिले भाषण आणि मोठी गर्दी.. धाडस लागतो! लंबे रेस का घोडा है..याद रखना!!, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं.

पार्थ पवार यांचं भाषण

पुण्यातील चिंचवडमध्ये रविवारी 17 मार्चला मावळ लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीची जाहीर सभा होती. या सभेत मावळचे उमेदवार पार्थ पवार यांनी पहिलं भाषण केलं. आज आपले पहिलेच भाषण आहे, त्यामुळे चूकभूल झाली तर माफ करा, असंआर्जव पार्थ यांनी केलं. जवळपास अडीच मिनिटांचं हे भाषण होतं.

आज माझं पहिलं भाषण आहे, ते पण साहेब आणि दादांसमोर… त्यामुळे काही चुकामुका झाल्या तर सांभाळून घ्या. आपला देश कुठे चाललाय हे आपल्या सर्वांना दिसतंय. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार हे असंख्य प्रॉब्लेम्स या सरकारने आपल्यासमोर ठेवलेले आहेत. या सरकारने भारत.. भारताला कठीण पोजिशनमध्ये ठेवलंय, अडचणीत आणलंय.. आपलं जेव्हा सरकार होतं, यूपीए सरकारने जेवढे पण कामं केलं, जेवढे पण विकास केले, या सरकारांनी तशे काहीच केले नाही. हे फक्त बीजेपी सरकार आहे, फक्त स्वप्न दाखवणारं आहे, असा आरोप पार्थ यांनी केला होता.

संबंधित बातम्या

VIDEO: मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचं पहिलं जाहीर भाषण