सौदेबाजी करण्यासाठी सदाभाऊ खोतांचा नवा पक्ष : राजू शेट्टी

| Updated on: Jan 24, 2020 | 8:14 AM

माजी मंत्री सदाभाऊ खोत स्वतंत्र पक्ष काढत आहेत. त्यातून सौदेबाजी करायला त्यांना आणि एक व्यासपीठ मिळेल, अशी टीका शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty Criticized on Sadabhau Khot)  यांनी केली.

सौदेबाजी करण्यासाठी सदाभाऊ खोतांचा नवा पक्ष : राजू शेट्टी
Follow us on

उस्मानाबाद : माजी मंत्री सदाभाऊ खोत स्वतंत्र पक्ष काढत आहेत. त्यातून सौदेबाजी करायला त्यांना आणि एक व्यासपीठ मिळेल, अशी टीका शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty Criticized on Sadabhau Khot)  यांनी केली. त्यासोबतच शेट्टी यांनी अनेक मुद्द्यांवरुन सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला. उस्मानाबाद येथे राजू शेट्टी यांनी आपले मत टीव्ही 9 शी बोलताना (Raju Shetty Criticized on Sadabhau Khot) व्यक्त केले.

सदाभाऊ खोत स्वतंत्र पक्ष काढत आहेत. त्यातून सौदेबाजी करायला त्यांना आणि एक व्यासपीठ मिळेल. मी कधीही मॅनेज होत नाही. सत्तेला कोण चिटकले आहे हे सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे. त्यामुळे शेतकरी माझ्या पाठीशी कायम आहेत. सदाभाऊंच्या मागे एकही शेतकरी यायला तयार नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.

मी सदाभाऊ खोत यांच्या विरोधात षडयंत्र रचले नाही. कडकनाथ कोंबडी प्रकरणात शेतकऱ्यांची फसवणूक झाली. सत्तेचा गैरवापर झाल्याने सागर खोतवर गुन्हा दाखल झाला. तो नंतर साक्षीदार झाला. कांगावा करण्यापेक्षा खोत यांनी चौकशीला सामोरे जावे. मी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली.

हातकणंगले येथे मी खासदार होणार की नाही हे येणारा काळच ठरवेल 2024 जवळच आहे. मनसे पक्षाची स्वतःची विचारधारा आहे त्याप्रमाणे ते चालत आहेत. राज ठाकरे यांचा चाहता वर्ग आहे त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाला थोडाफार राजकीय तोटा होईल, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.

मी वैफल्यग्रस्त नाही सदाभाऊ उलट आदळा आपट करीत आहे. शेतकऱ्यांना फसविणे राज्यकर्ते यांना परवडणारे नाही. चिंतामुक्त करण्याचे आश्वासन देऊन सत्ता घेतली मात्र आश्वासन पूर्ण न केल्यास शेतकरी सत्ता घालवतो, असंही शेट्टी म्हणले.

सरकार आणि पीक विमा कंपनी यांनी जनतेच्या पैशावर दरोडा टाकल्यचा आरोप शेट्टी यांनी केला. उस्मानाबाद जिल्ह्यात भीषण दुष्काळ असताना सोयाबीन पीक विमा नाकारला हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. राज्यपाल नुकसान भरपाई देतात मात्र विमा कंपनीनी हजारो कोटींचा पीकविमा घेऊन नफा कामविला आहे त्याची चौकशी करणे गरजेचे आहे. विमा कंपनीच्या लुटीचे पुरावे दिले तरी कारवाई होत नाही, असे शेट्टी म्हणाले.