Breaking News : शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीला अपघात, डम्परची धडक

| Updated on: Jan 07, 2023 | 12:05 AM

राजकीय नेत्यांचा सुरु असलेली अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये.

Breaking News : शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीला अपघात, डम्परची धडक
Follow us on

कृष्णकांत साळगावकर, टीव्ही9 मराठी : राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. राजकीय नेत्यांचा सुरु असलेली अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचा गाडीचा अपघात झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचाही प्रवास करतााना गाडीला अपघात झाला. त्यानंतर आता आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात झाला आहे. (former minsiter ramdas kadam son and dapoli mla yogesh kadam car accident at kashedi ghat dumper hit to van)

माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला आहे. कदम यांच्या गाडीला डम्परने जोरदार धडक दिली आहे. या धडकेत गाडीच्या मागील बाजूचा पूर्ण चेंदामेंदा झालाय. सुदैवाने यात योगेश कदम सुखरुप आहेत. मात्र त्यांच्या चालकाला आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसाला दुखापत झाली आहे.

जयकुमार गोरे यांना डिस्चार्ज

दरम्यान भाजप आमदार यांना अनेक दिवसांच्या उपचारानंतर आज (शुक्रवार 6 जानेवारी) 12 दिवसांनी अखेर डिस्चार्ज मिळाला. प्रकृती उत्तम असल्यामुळे गोरे यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. मला पुनर्जन्म मिळाला असून हा जन्म आता जनतेच्या सेवेत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशी भावना गोरे यांनी डिस्चार्जनंतर व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

“एवढ्या लवकर आपल्याला कुणी घेऊन जाऊ शकतं, अजून खूप लढाया, संघर्ष करायचा आहे. परमेश्वराने एवढ्या संकटातून मला पुन्हा आपल्यासोबत पाठवलं”, असं म्हणत गोरेंनी परमेश्वराचे आभार मानले.

गोरे यांचा 24 तारखेच्या पहाटे फलटणजवळ भीषण अपघात झाला होता. 12 दिवसांपासून जयकुमार गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.