Chandrakant Patil: ‘तर तुमचं साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त’,चंद्रकांत पाटील यांचा सतेज पाटलांना इशारा
जाईल तिथे सर्वांना पायाखाली घेणे अन् स्वत:ची टिमके वाजवणे, कारण कधीतरी मला मुख्यमंत्री व्हायचं आहे," असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला.

Gokul Chairman Election 2026: गोकुळ म्हणजेच कोल्हापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक आज पार पडत आहे. राज्य सरकारने गोकुळवर चार संचालक नियुक्त कर त्यांना मदतानाचा अधिकार दिल्याने सतेज पाटील यांच्या पॅनेलने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आजच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेमका कुणाचा कंडका पडणार? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी आज महायुतीने निकालाआधीच आपला अध्यक्ष झाल्याचे जाहीर करत सभा घेतली. सभेत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
“गेल्या 15 दिवसांपासून ज्याप्रकारे शिव्याशाप दिले ते आजच्या एका विजयाने थांबणार आहे. गेल्या 15 दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून महायुतीला बदनाम केले केले. निदान महायुती एकत्र तरी आहे, मात्र महाविकास आघाडी म्हणजे बंटी पाटील. बंटी पाटील यांच्यापाठीमागे ना ठाकरे गट होता ना राष्ट्रवादी होती. याचे कारण म्हणजे जाईल तिथे सर्वांना पायाखाली घेणे अन् स्वत:ची टिमके वाजवणे, कारण कधीतरी मला मुख्यमंत्री व्हायचं आहे,” असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला.
बंटी पाटलांना मुख्यमंत्री होण्याची स्वप्न..
“मुख्यमंत्री व्हायचं आहे तर त्याप्रकारची समज तरी पाहिजे. बंटी पाटील विरोधक असले तरी माझा आग्रह होता की बंटी म्हणू नये. मात्र या १५ दिवसात मला समजलं की ते बंटीच आहेत. बंटीचा बंटी साहेब झालाच नाही. कारण लहान मुलासारख वागल्यामुळे लोकांनीच असं मानलं की हा बंटीच आहे हा बंटी पाटील झालाच नाही,” असा घणाघात यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
‘दादागिरी चालणार नाही..’
“तुम्ही कराल ते योग्य अन् मुश्रीफ साहेब करतील तर अयोग्य हे आता चालणार नाही, ही दादागिरी चालणार नाही. आपली उंची
पाहून काम करा, आमच्यावर बोलू नका. तुम्ही काचेच्या घरात राहता. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांना दगड मारायची नसतात. तुम्हाला बंटी पाटील नावाने गोकुळ करायचं आहे. तुम्हाला मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडलं आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोळे वटारले तर तुमचं साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल, त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून मला फक्त आदेश द्यायचा आहे. हिंमत असेल तर यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केबिनमध्ये यापुढे जायचं नाही, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.