Radhakrishna Vikhe : न मागताच मिळालं मंत्रिपद, विखे पाटलांनी सांगितला विकास कामाचा ‘प्लॅन’

| Updated on: Aug 13, 2022 | 4:27 PM

महिन्याभरापूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर हे सरकार विश्वासघाताने आल्याचा आरोप विरोधकांकडू केला जात होता. पण शिंदे सरकार नव्हे तर महाविकास आघाडी सरकार हे विश्वासघाताने आले होते. मात्र, त्यांच्या सर्वच आघाड्या ह्या आता फोल ठरल्या आहेत. त्यांच्या या अशा राजकारणामुळे विकास कामे तर दूरच राहिली पण राजकीय पातळीही खलावल्याची टीका विखे पाटलांनी केली आहे.

Radhakrishna Vikhe : न मागताच मिळालं मंत्रिपद, विखे पाटलांनी सांगितला विकास कामाचा प्लॅन
राधाकृष्ण विखे पाटील
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

शिर्डी :  (Eknath Shinde) शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदावरुन झालेली नाराजी ही काय आता लपून राहिलेली नाही. एकीकडे शिंदे गटातील काही आमदार नाराज आहेत तर बच्चू कडूंचा देखील पहिल्या विस्तारात सहभाग झालेला नाही. असे असताना (Radhakrishna Vikhe Patil ) भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र, आपल्याला न मागताच मंत्रिपद मिळाले असल्याचे सांगितले. तर साईबाबांकडे काही मागाव लागत नाही फक्त हात जोडून लिन व्हाव लागत. कोणते खाते द्यायचे की नाही ते सर्वस्वी (BJP Party) पक्ष नेतृत्वाच्या हाती असते. आता पाठीमागे काय झाले हे न पाहता आता जनतेची कामे करण्यावर आपला भर असणार असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच मतदार संघात दाखल झाले होते. त्यांनी साईचे दर्शन घेतले असून कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

विश्वासघाताने आले होते मआविचे सरकार

महिन्याभरापूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर हे सरकार विश्वासघाताने आल्याचा आरोप विरोधकांकडू केला जात होता. पण शिंदे सरकार नव्हे तर महाविकास आघाडी सरकार हे विश्वासघाताने आले होते. मात्र, त्यांच्या सर्वच आघाड्या ह्या आता फोल ठरल्या आहेत. त्यांच्या या अशा राजकारणामुळे विकास कामे तर दूरच राहिली पण राजकीय पातळीही खलावल्याची टीका विखे पाटलांनी केली आहे. केवळ केंद्राकडे बोट दाखवंत या सरकारने अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. आता राज्यात खऱ्या अर्थाने विकास होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

केवळ जनेतेच्या कामाला प्राधान्य

राजकारणामुळे मूल जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होते. तेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले. पण आता शिंदे सरकारच्या काळात केवळ जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जाणार आहे. ग्रामीण जनतेच्या कामाच्या खात्याचा वापर करणे गरजेचे आहे. खाते कोणतेही असो त्याचा सर्वसामान्य जनतेला कसा उपयोग होईल यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

पक्षश्रेष्ठींचे मानले आभार

मंत्रिमंडळाचा विस्तार होताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिल्या क्रमांकालाच मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे सरकारमध्ये कुणाचा समावेश केला जातो याकडे राज्याचे लक्ष होते. शिवाय भाजपामध्येही इच्छूकांची संख्या अधिक होती. असे असले तरी विखे पाटलांचा पहिल्या क्रमांकालाच शपथविधी घेण्यात आला होता. पक्ष नेतृत्व जी जबाबदारी देतील त्या निर्णयास अधीन राहून काम करणार असल्याच विखे पाटील म्हणाले. मंत्रिमंडळात समावेश केल्याबद्दल त्यांनी पक्षश्रेष्ठींचेही आभार मानले.