शिंदेंच्या भूमिकेला लोकमान्यता मिळाल्याची पावती दसरा मेळाव्याने दिली- गुलाबराव पाटील

| Updated on: Oct 07, 2022 | 1:26 PM

ज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलंय. काय म्हणालेत? पाहा...

शिंदेंच्या भूमिकेला लोकमान्यता मिळाल्याची पावती दसरा मेळाव्याने दिली- गुलाबराव पाटील
Follow us on

अनिल केऱ्हाळे, प्रतिनिधी, TV9 मराठी, जळगाव : राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दसरा मेळाव्यावर (Eknath Shinde Dasara Melava) भाष्य केलंय. एकाच वेळी दोन झाले. तरी आमच्या मेळाव्यात आम्हाला अपेक्षित असलेल्या गर्दीपेक्षा जास्त गर्दी झाली. ही आमच्या भूमिकेची पोच पावती आहे. हिंदुत्वाचा विचार आणि शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे यांनी घेतलेला पवित्रा लोकांना मान्य असल्यानेच आम्हाला ही पावती मिळाली, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.

शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाली. त्यावर आमचं काहीच म्हणणं नव्हतं. झालं ते झालं. पण ज्यावेळी आम्ही सांगत होतो हवामानाचे अंदाज बदलत होते. सोसाट्याचा वारा येणार होता. पाऊस पडणार होता. तरीही आपण निर्णय बदलला नाही. म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.

राजकीय जीवनात वावरताना आपल्या आजूबाजूच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जावं लागतं. राजकीय क्षेत्रात सार्वभौम निर्णय घेणारी पार्टी चालेल. पण एकतर्फी निर्णय घेणारी पार्टी चालणार नाही, असंही पाटील म्हणालेत.

धनुष्यबाण कुणाला मिळणार?

धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबत सध्या चर्चा होतेय. त्यावर गुलाबराव पाटील बोललेत. आमच्याकडे खासदार, आमदार लोकप्रतिनिधी यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कायद्यानुसार धनुष्यबाण आम्हालाच मिळायला हवा, असं ते म्हणालेत.

35 वर्षे मी उद्धव ठाकरेंच्या जवळ राहिलो आहे. पण त्यांना कधीही बोलताना इतकं घसरलेलं पाहिलं नाही. पण या दसरा मेळाव्यात त्यांनी पातळी सोडली.दीड वर्षांच्या मुलावर त्यांनी टीका केली. राजकारणाची पातळी इतक्या खाली जाऊ नये, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.