आदित्य ठाकरेंनी सांभाळून बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर…; गुलाबराव पाटलांचा थेट ठाकरे घराण्याला इशारा

| Updated on: Oct 04, 2022 | 5:45 PM

बाळासाहेबांचं चित्र लावू नका असं त्यांनी सांगितलं. एकलव्याने जसं पुतळासमोर ठेवून धनुर्विद्या शिकली. स्वत:चा अंगठा कापून दिला. तसंच आता आम्हीही अंगठा कापून राज्य चालवत आहोत.

आदित्य ठाकरेंनी सांभाळून बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर...; गुलाबराव पाटलांचा थेट ठाकरे घराण्याला इशारा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

समीर भिसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: दसरा मेळाव्याला (dussehra rally) अवघे काही तास उरलेले असतानाच शिंदे गटाकडून थेट ठाकरे घराण्यावर टीका करण्यात आली आहे. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही टीका केली आहे. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांचा फोटो वापरावा की वापरू नये हे आम्हाला बोलण्याचा अधिकार फक्त उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना आहे. आदित्य ठाकरे यांना आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही जेव्हा राजकारण सुरू केलं. तेव्हा आदित्य ठाकरेंचा जन्मही झाला नसेल. त्यांनी सांभाळून बोलावं. नाही तर आम्ही तोंड उघडलं तर पळावं लागेल, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. गुलाबराव पाटील यांनी थेट ठाकरे कुटुंबावरच टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. तुम्हाला शिवसैनिक आणण्याचं टार्गेट दिलं आहे का? असा सवाल केला असता आम्हाला कोणतंही टार्गेट नाही. आमचं टार्गेट शिवसैनिक आहे. तो न बोलविता येत असतो. आता कुणी पायी तर येणार नाही. वाहनांची व्यवस्था तर करावीच लागेल. आम्ही 1966 साली जेव्हा यायचो. तेव्हा फक्त छातीला बिल्ला असायचा. शिवसेना जिंदाबादच्या घोषणा असायच्या. रेल्वेतून यायचो. आता काळ बदलला आहे. जसा काळ बदलतो, तसं बदलावं लागतं, असं ते म्हणाले.

उद्याच्या दसऱ्या मेळाव्यात आम्ही बाळासाहेबांचीच भूमिका मांडणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. यांच्यासाठी आम्ही काय झकमारी केली का?, असं बोलणं यांना शोभतं का? आम्ही अंगावर केसेस घेतल्या आहेत.आम्ही अंगावर केसेस घेतल्या आहेत. लोकांना जर विचारलं तर ते सांगतील 35 वर्ष आम्ही शिवसेनेसाठी काय केले आहे. त्यांनी जर तारतम्य पाळला तर आम्ही पाळू. त्यांनी जर आरे केलं तर आम्ही पण कारे करू, असा इशाराही त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

गद्दारी नावाचा कोरोना त्यांना झाला आहे. माहीत नाही त्यांचा हा कोरोना कधी जाईल. पण उद्या त्यांना उत्तर दिले जाईल, असं त्यांनी सांगितलं.

शिंदे गटाच्या टीझरमध्ये शिंदे यांचा एकलव्य म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. बाळासाहेबांचं चित्र लावू नका असं त्यांनी सांगितलं. एकलव्याने जसं पुतळासमोर ठेवून धनुर्विद्या शिकली. स्वत:चा अंगठा कापून दिला. तसंच आता आम्हीही अंगठा कापून राज्य चालवत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.