‘मला डॉक्टर व्हायचं होतं,पण झाले नाही, धनुभाऊ मात्र भाग्यवान..काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?
भाजपा नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे त्यांच्या वक्तव्यावरुन कायम चर्चेत असतात. आता एका कार्यक्रमात त्यांनी त्यांना खरेतर डॉक्टर व्हायचे होते. परंतू होता आले नाही याची खंत व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त आहे.

‘मला खरे तर डॉक्टर व्हायचे होते.परंतू मार्क कमी मिळाले म्हणून मी ऍडमिशन घेतले नाही. आमच्या प्रीतमताईंना वकील व्हायचे होते, परंतु त्या डॉक्टर झाल्या..आणि येसू ताई वकील झाल्या, धनुभाऊ मात्र भाग्यवान आहेत. त्यांना राजकारणी व्हायचं होतं आणि ते राजकारणातच आले. असेच होते ज्याला जे व्हायचे असते ते होता येत नाही अशी खंत भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी एका जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉक्टर होण्याच्या आपल्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाबद्दल एका जाहीर कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या मला खरेतर डॉक्टरच व्हायचं होते. धनुभाऊ भाग्यवान आहेत, त्यांना राजकारणात यायचे होते ते राजकारणात आले. मात्र, ज्याला जे व्हायचं असते ते होता येत नाही. असे म्हणत मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉक्टर होण्याच्या आपल्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाबद्दल एका जाहीर कार्यक्रमात मत व्यक्त केले.
परळी येथे आयोजित एका पार्थ सोलार प्लांटच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर आमदार धनंजय मुंडे हे देखील उपस्थिती होते. दरम्यान याचवेळी पंकजा मुंडे यांनी माझा आणि माझ्या व्यवसायाचा दूर दूरपर्यंत संबंध नाही. मी मोठी डिस्टिलरी चालवते परंतु त्याबाबत मला कुठलीही माहिती नसते. तिथला ब्रँड देखील मला माहित नाही असे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगताच उपस्थित यामध्ये एकच हशा पिकला.
वक्तव्याने भुवया उंचावल्या
पंकजा मुंडे यांना राजकारणाचा मोठा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाला महाराष्ट्रात गावोगावी नेण्यात मोठी भूमिका बजावली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात त्या त्यांचा राजकीय वारसा यशस्वीपणे पुढे चालवत आहेत. मध्यंतरी त्यांनी भाजप नेतृत्वावर आपल्या बोलण्यातून अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्यावर राजकारणात मागच्या सरकारमध्ये खिचडी घोटाळ्यावरुन आरोप झाले होते. त्यावेळी त्या एकट्या पडल्या होत्या. आता त्यांना पक्ष श्रेष्ठीशी जुळवून घेत. आताच्या सरकारमध्ये मंत्री झाल्या आहेत. मात्र, त्यांची राजकीय महत्वाकांक्षा कधी लपून राहिलेली नाही. आता त्यांनी अचानक आपल्या डॉक्टर व्हायचे होते. राजकारणात यायचे नव्हते असे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.