Tukaram Mundhe: तर तुकाराम मुंढे राजीनामा देतील… कचोरी दुकानाच्या मीम्सचा इंटरनेटवर धुमाकूळ

Tukaram Mundhe: सध्या सोशल मीडियावर एक मीम व्हायरल झाले आहे. या कचोरी दुकानातील अस्वच्छता पाहून तुकाराम मुंढे काय करतील हे दाखवण्यात आले आहे. आता नेटकरी नेमकं काय म्हणाले वाचा...

| Updated on: Aug 13, 2026 | 2:05 PM
1 / 6
महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन (FDA) चे आयुक्त आणि ‘सिंगम’ म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या धडाकेबाज कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान सोशल मीडियावर त्यांचे काही मीम्स व्हायरल होत आहे. या मीम्समध्ये एका काचोरी दुकानाचा उल्लेख केला आहे. जर तुकाराम मुंढे या दुकानात गेले तर राजिनामा देतील असे मजेशीर अंदाजात म्हटले आहे.

2 / 6
आता सोशल मीडियावर कोलकातामधील एका कचोरी विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कचोरी विक्रेत्याचे दुकान पाहून अक्षरश: अंगावर काटा येईल. पण तरीही अनेकजण या दुकानातून कचोरी खरेदी करताना दिसत आहेत. या कचोरीची किंमत 50 रुपये असल्याचे बोलले जात आहे.

3 / 6
तुकाराम मुंढे हे महाराष्ट्रात भेसळखोरांचे धाबे दणाणणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. एफडीए आयुक्तांची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांनी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, खाद्यतेलाची भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. त्यामुळेच ‘शुद्ध अन्न’ आणि ‘स्वच्छता’ या दोन शब्दांशी त्यांचे नाव जोडले गेले आहे. याउलट, कोलकात्यातील बरा बाजार परिसरातील चांगणी  क्लब कचोरी दुकान हे स्ट्रीट फूडच्या जगात एक आयकॉन आहे

4 / 6
येथील कुरकुरीत क्लब कचोरी, मसालेदार आलूची भाजी आणि भुजिया यांचे कॉम्बिनेशन चवीला अप्रतिम आहे. मात्र, दुकानाची स्थिती, सेवा आणि स्वच्छतेबाबत नेहमीच चर्चा होते. काही व्ह्लॉगर्सनी याला “जगातील सर्वात अस्वच्छ स्ट्रीट फूड” असेही म्हटले आहे. तरीही चवीमुळे रांग लागतेच.

5 / 6
या दोन गोष्टींचा संगम झाल्यावर सोशल मीडिया युजर्सना मीम तयार करायला वेळच लागला नाही. “जर तुकाराम मुंढे या दुकानात आले तर...” अशा अनेक व्हेरिएंट्स तयार होत आहेत. काहींनी त्यांना ऍप्रन, हातमोजे आणि हेड कव्हर घालून दाखवले आहे, तर काहींनी “हा चाचा बंगालची कचोरी कल्चर एकट्याने नष्ट करेल” असे कमेंट केले आहेत.

6 / 6
एकीकडे महाराष्ट्रात मुंढे यांची कारवाई सुरू आहे, तर दुसरीकडे कोलकात्यातील या दुकानाचे जुने व्हिडिओ आणि ‘अस्वच्छ पण चविष्ट’ अशी ओळख पुन्हा चर्चेत आली. मुंढे यांची इमेज आणि क्लब कचोरी दुकानाची ‘रॉ’ स्ट्रीट फूड इमेज यांचा विरोधाभास इतका मजबूत आहे की मीम्स आपोआप तयार होत आहेत. काहींनी तर म्हटले आहे की, “मुंढे साहेब या दुकानात गेले तर राजीनामा नाही तर थेट सीलबंद करतील!” हा मीम फक्त मनोरंजनाचा विषय नाही. तो महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील स्ट्रीट फूड संस्कृती, स्वच्छतेबाबतचा वेगवेगळा दृष्टीकोन आणि सोशल मीडियाची क्रिएटिव्हिटी यांचा मजेदार संगम आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us