Sambhaj Raje : महाराष्ट्रात रहायचं तर थोर महापुरुषांची नावे घ्यावीच लागतील, अन्यथा राज्याबाहेर हाकला, राजेंचा रोष कुणावर?

अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले होते. महाराष्ट्रात राहून हे धाडस करण्याची हिम्मत वाढत आहे. ते राज्यासाठी घातक आहे. याला वेळीच आवर घातली नाहीतर असे प्रकार वाढत जातील. राज्यात रहायचे म्हणल्यावर थोर पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच, शाहू, फुले आंबेडकरांच नाव घ्यायला पाहिजे असेही राजेंनी आवाहन केले आहे.

Sambhaj Raje : महाराष्ट्रात रहायचं तर थोर महापुरुषांची नावे घ्यावीच लागतील, अन्यथा राज्याबाहेर हाकला, राजेंचा रोष कुणावर?
छत्रपती संभाजीराजे
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Aug 07, 2022 | 4:43 PM

पुणे :  (Maharashtra State) महाराष्ट्रामध्ये रहायचे आणि गोडवे मात्र औरंगजेबचे गायचे..हे राज्यातील जनता कदापीही सहन करु शकणार नाही. त्यामुळे (Abu Azmi) अबू आझमी यांना जर महाराष्ट्रात रहायचे असेल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच, शाहू, फुले आंबेडकरांच नाव घ्यायला पाहिजे अन्यथा त्यांना राज्याबाहेर फेकायला पाहिजे अशी भूमिका (Chhatrapati Sambhaji Raje) माजी खा. छत्रपती संभाजी राजे यांनी मांडली आहे. महाराष्ट्राला मोठा इतिहास आहे. राज्यात सर्व जाती-पंताचे नागरिक वास्तव्यास असले तरी औरंगजेबचे गुणगान कोणी करीत नाही. यांच्यामध्येच हे धाडस कसे निर्माण होते. यासाठी कोणी एकाने आवाज उठवून प्रश्न मिटणार नाहीतर नागरिकांनीच त्यांना हाकलून दिलं पाहिजे असे मत संभाजी राजे यांनी व्यक्त केले आहे.

लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन

एका सात वर्षाय मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे अशा नराधमाला कठोरात कठोर शासन व्हावे अशी अपेक्षा राज्यातील जनत करीत आहे. महाराष्ट्राचे हे संस्कार नसले तरी दिवसेंदिवस अशा घटना ह्या वाढत आहे. कायदा कडक करण्यासाठी पार्लमेंटमध्ये खासदारांनी आवाज उठवायला हवा, जेणेकरून अस धाडस कोणी करणार नाही, कायद्याचा धाक राहिला नसल्यानेच अशा घटना वाढत असल्याचे राजे यांनी सांगितले आहे.

अबू आझमीवर टीकास्त्र

अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले होते. महाराष्ट्रात राहून हे धाडस करण्याची हिम्मत वाढत आहे. ते राज्यासाठी घातक आहे. याला वेळीच आवर घातली नाहीतर असे प्रकार वाढत जातील. राज्यात रहायचे म्हणल्यावर थोर पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच, शाहू, फुले आंबेडकरांच नाव घ्यायला पाहिजे असेही राजेंनी आवाहन केले आहे. लोणावळ्यात शिवक्रांती कामगार संघटनेच्या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ही टीका अबू आझमी यांच्यावर केली आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार तातडीने व्हावा

राज्य सरकाराची स्थापना होऊन 36 दिवस उलटले तरी प्रत्येक खात्याला मंत्री मिळालेला नाही. त्यामुळे कामे खोळंबली जातात तसेच मंजूर झालेली कामेही मार्गी लागत नाहीत. यातच राज्यात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. असा परस्थितीमध्ये नुकासनीचा आढावा, योग्य यंत्रणांचा वापर ही कामे होणे गरजेचे आहे. सचिवांना अधिकार हा काही त्याच्यावरचा पर्याय नाही. त्यामुळे राज्याचा गाडा सुरळीत चालण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.