तब्बल 15 वर्षांनी महाराष्ट्रातून इम्तियाज जलील यांच्या रुपात मुस्लीम खासदार

| Updated on: May 26, 2019 | 3:43 PM

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमधून विजय मिळवला आणि तब्बल 15 वर्षांनी महाराष्ट्रातून मुस्लीम खासदार निवडून येण्याचा मानही मिळवला. इम्तियाज जलील औरंगाबादमधील चौरंगी लढतीत पाच हजार मतांच्या फरकाने जिंकले. काँग्रेसचे उमेदवार सुभाष झाम्बड, शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव या तगड्या उमेदवारांना पराभूत करत इम्तियाज जलील यांनी विजय […]

तब्बल 15 वर्षांनी महाराष्ट्रातून इम्तियाज जलील यांच्या रुपात मुस्लीम खासदार
Follow us on

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमधून विजय मिळवला आणि तब्बल 15 वर्षांनी महाराष्ट्रातून मुस्लीम खासदार निवडून येण्याचा मानही मिळवला. इम्तियाज जलील औरंगाबादमधील चौरंगी लढतीत पाच हजार मतांच्या फरकाने जिंकले. काँग्रेसचे उमेदवार सुभाष झाम्बड, शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव या तगड्या उमेदवारांना पराभूत करत इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला. इम्तियाज जलील हे एमआयएमचे आमदार होते. अत्यंत अभ्यासू, आक्रमक आणि वक्तृत्त्वातही वाकबगार असा नेता म्हणून इम्तियाज जलील यांच्याकडे पाहिले जाते.

2004 साली रायगड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून बॅरिस्टर ए. आर. अंतुले विजयी झाले होते. मात्र, बॅरिस्टर अंतुलेही 2009 साली पराभूत झाले. शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी अंतुले यांचा 2009 साली पराभव केला. बॅरिस्टर अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही राहिले होते. बॅरिस्टर अंतुल यांच्यानंतर महाराष्ट्रातून कुणीही मुस्लीम खासदार निवडून गेला नव्हता. मात्र, अखेर इम्तियाज जलील यांच्या रुपात महाराष्ट्रात 15 वर्षांनी मुस्लीम खासदार निवडून आला आहे.

इम्तियाज जलील यांच्या एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन विकास महासंघाने एकत्र येत वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील 48 पैकी 47 जागांवर उमेदवार उभे केले होते. अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना चांगली मतं मिळाली. अनेक ठिकाणी तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाही जबर फटका बसला.

औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून चारवेळा खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांना इम्तियाज जलील यांनी पराभूत केले. काँग्रेसकडून सुभाष झाम्बड आणि अपक्ष म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव रिंगणात होते. या सर्व मतविभाजनाचा फायदा आणि मुस्लीम, दलित मतं यांचा फायदा इम्तियाज जलील यांना झाला. शिवाय, इम्तियाज जलील यांची प्रतिमाही आक्रमक, अभ्यासू नेता म्हणूनच औरंगाबादमध्ये आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्रातून आणखी एक तगडा मुस्लीम उमेदवार रिंगणात होता. ते म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार हिदायत पटेल. अकोल्यातून हिदायत पटेल रिंगणात होते. मात्र, हिदायत पटेल अकोल्यात तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. अकोल्यातून स्वत: प्रकाश आंबेडकर मैदानात होते. भाजपचे संजय धोत्रे हे अकोलत्यात विजयी झाले.

भारतातील सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि नंतर महाराष्ट्र असे अनुक्रमे सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेले राज्य आहेत. मुंबई, मराठवडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मुस्लीम मतदारांची संख्या ठळक प्रमाणात आहे.

महाराष्ट्रातून लोकसभेत निवडून गेलेले मुस्लीम खासदार :

  • मोहम्मद मोहिबुल हक (अकोला – 1962)
  • समादली सय्यद (जळगाव – 1967)
  • असगर हुसैन (अकोला – 1967)
  • अब्दुल सालेभॉय (मुंबई – 1971)
  • केएम असगर हुसेन (अकोला – 1971)
  • अब्दुल शफी (चंद्रपूर – 1971)
  • गुलाम नबी आझाद (वाशिम – 1980)
  • काझी सलीम (औरंगाबाद – 1980)
  • हुसैन दलवाई (रत्नागिरी – 1984)
  • गुलाम नबी आझाद (वाशिम – 1984)
  • बॅरिस्टर ए. आर. अंतुले (रायगड – 1989, 1991, 1991, 1996, 2004)