मी आज भलेही लोकसभेत गेलोय, मला पाठवण्यामध्ये अब्दुल सत्तारांचा हात, इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानं खळबळ

इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे तत्कालीन खासदार चंद्रकात खैरे यांचा पराभव केला होता. इम्तियाज जलील यांनी त्यावेळची निवडणूक एमआयएमतर्फे लढवली होती.

मी आज भलेही लोकसभेत गेलोय,  मला पाठवण्यामध्ये अब्दुल सत्तारांचा हात, इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानं खळबळ
इम्तियाज जलील
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 27, 2022 | 3:52 PM

औरंगाबाद : औरंगाबादचे (Aurangabad) खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी आज एक गौप्यस्फोट केला आहे. इम्तियाज जलील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मधून निवडून आले होते. इम्तियाज जलील यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी सध्या शिवसेनेत असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abul Sattar) यांनी मदत केल्याचं सांगितलं आहे. अब्दुल सत्तार हे त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे तत्कालीन खासदार चंद्रकात खैरे यांचा पराभव केला होता. इम्तियाज जलील यांनी त्यावेळची निवडणूक एमआयएमतर्फे लढवली होती, इम्तियाज जलील यांना वंचितचा पाठिंबा देखील होता.लोकसभेत निवडून जाण्यापूर्वी इम्तियाज जलील महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य होते. अब्दुल सत्तार आणि इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत वैजापूर तालुक्यात एका कार्यक्रमाचं आयजन करण्यात आलं होतं,त्या कार्यक्रमात ते बोलत होते.

अब्दुल सत्तार यांच्यामुळं विजयी झालो

अब्दुल सत्तार यांच्या मुळेच मी लोकसभेत निवडून आलो आहे अशा स्वरूपाचं खळबळजनक विधान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या खंडाळा गावातील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात इम्तियाज जलील बोलत होते. यावेळी मंचावर अब्दुल सत्तार हेही उपस्थित होते.

अब्दुल सत्तार त्यावेळी काँग्रेसमध्ये

2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीनं एमआयएमसोबत महाराष्ट्रात उमेदवार दिले होते. वंचित आणि एमआयएच्या आघाडीनं 48 जागा लढवल्या होत्या. वंचित आणि एमआयएमच्या उमदेवारांना चांगली मत मिळाली होती. त्यांच्या आघाडीचे खासदार म्हणून इम्तियाज जलील निवडून आले होते. त्यावेळी काँग्रेसमध्ये असणारे आमदार अब्दुल सत्तार यांनी इम्तियाज जलील यांना त्यावेळी मदत केल्याचं इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं आहे.

इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यामुळं खळबळ

सध्या शिवसेनेत आणि राज्यमंत्री असणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी त्या लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस आमदार असून देखील एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना मदत केल्याचं पुढं आल्यानं काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या:

आमदारांना घर देण्याऐवजी फुटपाथवर झोपणाऱ्यांना द्या, सदाभाऊंची परखड फेसबुक पोस्ट

Video : मी तिजोरी नाही उघडली तर काय देणार “घंटा”? अजित पवारांची गाडी पुन्हा घसरली, मान्यही केलं