Chhagan Bhujbal : एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला राष्ट्रवादीतून विरोध झालेला का? भुजबळांनी सांगितलं पडद्यामागच सत्य

Chhagan Bhujbal : "ईव्हीएम मध्ये गडबड असती, तर जरांगे येऊ आणि आणखी कोणी येऊ ईव्हीएमने उलटा सुलटा करून मला दीड ते दोन लाख मताधिक्यावर पोहोचवले असते" असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Chhagan Bhujbal : एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला राष्ट्रवादीतून विरोध झालेला का? भुजबळांनी सांगितलं पडद्यामागच सत्य
chhagan bhujbal
| Updated on: Feb 20, 2025 | 11:32 AM

“मॉक पोल काय आहे ते मला माहिती नाही. काय करायचं ते करा. मी ते वाचलं आहे. मला जर ईव्हीएमचा फायदा मिळाला असता तर मी दीड-दोन लाख मतांनी निवडून आलो असतो. 60 हजार मतांनी मी नेहमीच निवडून आलो. ह्या वेळेला केवळ जरांगेमुळे माझे मताधिक्य कमी झाले” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले. “ईव्हीएम मध्ये गडबड असती, तर जरांगे येऊ आणि आणखी कोणी येऊ ईव्हीएमने उलटा सुलटा करून मला दीड ते दोन लाख मताधिक्यावर पोहोचवले असते” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

“मात्र असे न होता, माझे मताधिक्य कमी झाले. त्यामुळे मी कसे म्हणू की ईव्हीएममध्ये गडबड आहे. त्यामुळे ईव्हीएमचा फायदा झाला असता, तर माझी मते देखील वाढायला हवी होती” असं छगन भुजबळ म्हणाले. “ईव्हीएमची गडबड असती, तर मला फायदा का मिळाला नाही हा माझा मुद्दा आहे” असे छगन भुजबळ म्हणाले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ज्यूनियर म्हणून एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध झाला असा दावा काल संजय राऊत यांनी केला होता. त्यावर छगन भुजबळ बोलले.

‘परंतु मी असं ऐकलं आहे’

“काका-पुतण्यांनी काय केलं? हे माहिती नाही. परंतु मी असं ऐकलं आहे. आमदारांना सांभाळण्यासाठी ज्येष्ठ आणि प्रमुख माणूस त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. हे खरच आहे, मंत्रिमंडळात अनेक सिनिअर लोकं होते. त्यावेळेस एकनाथराव हे ज्युनिअर होते. मी 91 पासून मंत्री आहे. अजित पवार हे देखील 93 पासून मंत्री आहेत. मग, अशा वेळी त्यांनी हे म्हटलं हे सगळं सांभाळायचं असेल सिनिअर मनुष्य कोणीतरी पाहिजे. हे म्हणाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही” असं छगन भुजबळ म्हणाले. आमदारांची सुरक्षा कमी करण्याच्या मुद्यावर छगन भुजबळ म्हणाले की, “मला काही कल्पना नाही. मी मंत्रिमंडळात देखील नाही. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब चौकशी करून लक्ष देतील”