
बिहार विधानसभेत आज नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारनं बहुमत सिद्ध केलं. बहुमत चाचणीवेळी मोठा गोंधळ झाला. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी बहुमत चाचणीवर बहिष्कार (Boycott) टाकला. त्यानंतर ते सभागृहाबाहेर गेले. बहुमत चाचणीच्यावेळी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 2020 मध्ये मला मुख्यमंत्री (Chief Minister) व्हायचं नव्हतं. पण, भाजपनं माझ्यावर दबाव टाकल्याचा खुलासा नितीश कुमार यांनी केला. भाजपचं म्हणणं होतं की, आवाजी मतदानानं विश्वासमतं पारित झालं. मग, मतदानाची गरज काय. परंतु, मतदान झालं. भाजपनं मतदानावर बहिष्कार टाकला. मतदानात (Voting) नितीश कुमार यांच्या बाजूनं 160 मतं पडली.
– Janata Dal (United) (@jduonline) 24 Aug 2022
सभागृहात आपल्या भाषणाची सुरुवात नितीश कुमार यांनी भाजपवर हल्लाबोल करून केली. ते म्हणाले, भाजपनं आधी नंदकिशोर यादव यांना विधानसभा अध्यक्ष करण्याचं ठरविलं होतं. परंतु, नंतर विजय सिंहा यांना विधानसभा अध्यक्ष बनविण्यात आलं. नितीश कुमार पुढं म्हणाले, 2020 जास्त जागा भाजपच्या असल्यानं त्यांनी मुख्यमंत्री करावा, असं म्हटलं होतं. परंतु, माझ्यावर मुख्यमंत्री पद स्वीकारावं यासाठी दबाव टाकण्यात आला. नितीश कुमार यांचं नाव 2024 मधील निवडणुकीवरून चर्चेत आले. विरोधी पक्षाकडून नितीश कुमार यांचं नाव पीएम पदासाठी सांगितलं जातंय. परंतु, माझी इच्छा काही होण्याची नसल्याचं त्यांनी सांगितलं.
भाजपची साथ सोडल्याबद्दल देशातील बहुतेक पक्षांनी त्यांच्या निर्णयाला योग्य ठरविलं. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी म्हटलं की, सर्व मिळून लढल्यास 2024 ची निवडणूक भाजपला भारी पडू शकते. केंद्राकडून फक्त प्रचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपनं जेडीयूला संपविण्याचा कट रचण्यात येत होता. सर्व जुन्या नेत्यांना बाजूला करण्यात आलं. अटल बिहारी वाजपेयी आजारी होते. तेव्हा लालकृष्ण अडवानी यांना सत्ता मिळायला हवी होती. परंतु, असं झालं नाही. पाटणा विद्यापीठाला केंद्राच्या विद्यापीठाचा दर्जा देण्याची मागणी मान्य झाली नसल्याचं ते म्हणाले.
नितीश कुमार भाजप आमदार नितीन नवीन यांना म्हणाले, हे बोलतील तेव्हा केंद्रावाले यांना समोर करतील. विरोध करतील तेव्हा केंद्राकडून त्यांना योग्य जागा दिली जाईल. केंद्रानेच सभागृहातून पळण्याचा आदेश दिला असेल. नितीश कुमार यांच्यापूर्वी तेजस्वी यादव यांनी सभागृहाला संबोधित केलं. ते म्हणाले, भाजपला 2024 च्या निवडणुकीची भीती आहे. 2024 मध्ये बिहारमध्ये लोकसभेच्या 40 पैकी 40 जागा आम्ही जिंकणार आहोत. भाजप भीतीमुळं सभागृहात आमचा सामना करू शकली नाही. त्यामुळं भाजप सीबीआय, ईडी आणि आयटीला समोर करत आहेत. बिहार, गृरुग्रामसह 24 ठिकाणी छापेमारी झाल्याचं त्यांनी सांगितलं.