जळगावात महापौर निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक धक्का; ऑनलाईन निवडणुकीला कोर्टाची परवानगी

| Updated on: Mar 18, 2021 | 9:46 AM

महापौरपदासाठी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. | Jalgaon Mayor election

जळगावात महापौर निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक धक्का; ऑनलाईन निवडणुकीला कोर्टाची परवानगी
आरक्षणाबाबत भाजपची विचारधारा वेगळीच
Follow us on

औरंगाबाद: जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या (Jalgaon Mayor Election) तोंडावर भाजपला (BJP) आणखी एक धक्का बसला आहे. या निवडणुकीसाठी ऑनलाईन मतदान घेण्याला भाजपने (BJP) विरोध केला होता. महापौरपदासाठी प्रत्यक्ष मतदान व्हावे, असा आग्रह धरत भाजपने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. (HC denied bjp petition against online Jalgaon Mayor election)

त्यामुळे महापौरपदासाठी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फक्त नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. त्यामुळे जळगावात महाविकासआघाडीचे पारडे आणखी जड झाले आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची जय्यत तयारी

महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून बुधवारी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर भाजपचे बंडखोर नेते कुलभूषण पाटील उपमहापौर पदासाठी रिंगणात उतरले आहेत. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि विनायक राऊत हे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जवळपास शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात आहे.

भाजपला फाटाफूट होण्याची भीती

भाजपने अद्यापही महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नसून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी भाजप आपला उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापौर व उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीआधीच भाजपमध्ये पडलेल्या फुटीमुळे निवडणूक चुरशीची झाली आहे. शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांना व्हीप बजावून जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांना मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तर सर्व भाजपने देखील नगरसेवकांना व्हीप बजावून पक्षाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पक्षाच्या उमेदवाराव्यतिरिक्त इतर पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास संबंधित नगरसेवकांवर कारवाईचा इशारा देखील भाजपने दिला आहे . भाजपकडून प्रतिभा कापसे व दीपमाला काळे यांचे नाव महापौरपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. तर उपमहापौरपदासाठी अद्यापही कोणत्याही नावावर चर्चा झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संबंधित बातम्या :

सांगलीत महापौर निवडणूक नाट्यमय वळणावर, भाजपचे नऊ नगरसेवक नॉट रिचेबल

जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, भाजपची सत्ता उलथवली, सांगली महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी

(HC denied bjp petition against online Jalgaon Mayor election)