सरकारची दोन हजार कोटींची घोषणा, म्हणजे हवेतल्या गप्पा, जत तालुक्यातील नागरिकांची खदखद बाहेर

| Updated on: Dec 04, 2022 | 10:25 PM

जत तालुक्यातील पाणी प्रश्नाचा जर का 24 तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर आम्ही 42 गावासह विविध ठिकाणी बैठका घेऊन कर्नाटकात जाण्याबाबत निर्णय घेणार आहोत असा सज्जड दमही या समितीने दिला आहे.

सरकारची दोन हजार कोटींची घोषणा, म्हणजे हवेतल्या गप्पा, जत तालुक्यातील नागरिकांची खदखद बाहेर
Follow us on

सांगली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील 40 गावांवर दावा केला होता. त्यानंतर त्यांनी अकलूज आणि पंढरपूरही दावा सांगितला होता. मात्र जत तालुक्यातील गावांना कर्नाटकातून पाणी सोडण्यात आल्यावर मात्र हा वाद टोकाला गेला. त्यावरूनच हा वाद आता आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे. आधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमाभागातील गावांवर दावा केल्यानंतर आता सांगलीतील जत तालुक्यामधील गावांनीच आता कर्नाटकात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर 2 हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती.

त्याबाबत येत्या मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा अन्यथा 24 तारखेपासून आम्ही कर्नाटकात जाण्याबाबत बैठका घेऊ असा अल्टिमेटम मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता या नव्या वादाला सुरूवात होणार असल्याचे दिसून येत आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 हजार कोटींच्या मोठ्या घोषणा केली होती, मात्र ती खोट्या ठरल्या आहेत असं वक्तव्य पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी केले आहे.

त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आताच्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये हा विषय मंजूर करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ मोठ्या घोषणा केल्या होत्या मात्र त्या घोषणा सीमाभागाील लोकांपर्यंत पोहचल्याच नाहीत.

त्यामुळे या घोषणा खोट्या ठरल्या असल्याचा ठपकाही पाणी संघर्ष समितीने ठेवला आहे. त्यामुळे 2 हजार कोटीची घोषणा म्हणजे हे थोतांड असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

ज्या प्रकारे सरकारकडून या घोषणा केल्या जातात, त्या योजनांची सरकारने कागदोपत्री तरतूद करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दोन हजार कोटी रुपयांची घोषणा केली गेली मात्र त्याबाबत येत्या मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला जावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी ती घोषणा जाहीर केल्यावर त्याला होणारा विरोध तरी पाणी संघर्ष समितीला कळेल असं मतही या समितीने मांडले आहे.

जत तालुक्यातील पाणी प्रश्नाचा जर का 24 तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर आम्ही 42 गावासह विविध ठिकाणी बैठका घेऊन कर्नाटकात जाण्याबाबत निर्णय घेणार आहोत असा सज्जड दमही या समितीने दिला आहे.

मंत्री उदय सामंत उद्या उमदीमध्ये समस्या पाहण्यासाठी येत आहेत. त्याविषयी पाणी समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी बोलताना सांगितले की, त्यांनी या ठिकाणी यावं, आम्ही त्यांचे स्वागत करू मात्र आमच्या समस्या पाहून त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान आम्ही पुढच्या रविवारीदेखील एक बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या पुढच्या आमच्या सगळ्या भूमिका या सरकारसाठी अल्टिमेटिमच असतील असा इशारा देत सुनील पोतदार यांनी सांगितले की, जत तालुक्यातील पाणी प्रश्नाचा जर का 24 तारखेपर्यंत निर्णय घेतला गेला नाही तर आम्ही 42 गावांसह विविध ठिकाणी बैठका घेऊन कर्नाटकात जाण्याबाबत निर्णय घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.