Jayant Patil: महायुतीचे संचालक फुटणार? जयंत पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, संघर्ष मोर्चात तुफान बरसले!

न्यायालयाचा निकालही आम्ही लावू शकतो अशी वल्गणा करणारे पलिकडच्या बाजूला आहेत," अशा शब्दात जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. 

Jayant Patil: महायुतीचे संचालक फुटणार? जयंत पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, संघर्ष मोर्चात तुफान बरसले!
| Updated on: Nov 09, 2026 | 2:35 PM

Kolhapur Sangharsh Morcha 2026:  गोकुळच्या निवडणुकीनंतर राज्य सरकारने चार संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस नेते बंटी पाटील यांच्यासह विरोधकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय लोकशाहीचा गळा घोटणारा आहे, असा घणाघात करत कोल्हापुरमध्ये आज या निर्णयाविरोधात संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून कोल्हापुरकर रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चामध्ये बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टिका करत हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा दुष्परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

Loading...

“आजपर्यंत लोकशाहीचा आदर करुन भारतात लोकशाही चालत होती. त्याच तत्वावर देशातल्या सहकारी संस्था चालत होत्या. आणि तज्त्र स्वीकृत सल्ला देत होते. तज्ज्ञ दोन पेक्षा जास्त नसावेत असा शिरस्ता आहे. मात्र पहिल्यांदाच हा प्रकार महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रात तुम्ही आम्ही पाहायला लागलोय. लोकशाहीची सर्व मुल्ये धाब्यावर बसवण्याचे काम या सरकारमध्ये झाले आहे. न्यायालयाचा निकालही
आम्ही लावू शकतो अशी वल्गणा करणारे पलिकडच्या बाजूला आहेत,” अशा शब्दात जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर तोफ डागली.

“देशामध्ये न्याय आहे का? न्याय नसेल तर अशी लोक रस्त्यावर येतील हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवा. लोकांच्या डोळ्यात याल एवढे करु का. आम्ही आजही देवेंद्र फडणवीस यांची इच्छा नाही असं म्हणतो. मात्र देवेंद्र फडणवीस यांना लोकशाही राखायची असती तर ते सहकाऱ्यांच्या दबावाला बळी पडले नसते. एवढ्या गोकुळपुरता हा निर्णय आहे असं समजू नये. लोकशाही मुल्ये माणणाऱ्या प्रत्येक मतदारासंदर्भात
हा निकाल आहे,” असंही जयंत पाटील म्हणाले.

महायुतीच्या संचालकांची माझ्याशी चर्चा? 

“आपले 12 आत गेले तर ते आपले राहणार नाहीत अशी सत्ताधाऱ्यांना भिती आहे ते 12 आत आले आणि समोर बसले तर दुसऱ्या तिसऱ्या मिटिंगनंतर बंटी पाटलांचे 17 होतील. कारण तिकडंही हे चाललंय ते बरे नाही असं समजणारी मंडळी आहे. माझ्याशी त्यांनी चर्चा केली आहे. ते म्हणतात लगेच कसं करायचं? आम्हाला आममध्येच जाऊ देत नाहीत,” असा सर्वात मोठा गौप्यस्फोटही यावेळी जयंत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, ” कोर्टाचा निर्णय झालेला आहे 25 जणांवर निर्णय घ्या, 13, 12चा निकाल घ्या, मात्र त्यांना मताचा अधिकार देऊ नका. महाराष्ट्र सरकारला कळकळीची विनंती आहे. त्याचे परिणाम दुष्परिणाम सर्वांना भोगायला लागतील. बंटी पाटलांना तुम्ही आशीर्वाद दिला, ताकद दिली. अन्याय झाला तर आम्ही पाठीशी उभे राहतो हे तुम्ही दाखवून दिलं,” असं म्हणत जयंत पाटील यांनी कोल्हापुरकरांचे कौतुक केले.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us