भाजप अनिल परब यांना कोर्टात खेचणार, राणेंना जामीन मिळाल्यांनतर संघर्ष आणखी पेटणार ?

| Updated on: Aug 24, 2021 | 11:59 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी तर हे राज्य गुडांच्या मदतीने सुरु असल्याचा आरोप करत मंत्री अनिल परब यांना कोर्टात खेचणार असल्याचे सांगितले. मंत्री अनिल परब यांच्या माध्यमातून राणे यांना अटक करण्यासाटी दबाव टाकला जात होता, अशी चर्चा सुरु झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी हे वरील वक्तव्य केले आहे.

भाजप अनिल परब यांना कोर्टात खेचणार, राणेंना जामीन मिळाल्यांनतर संघर्ष आणखी पेटणार ?
परिवहन मंत्री अनिल परब, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
Follow us on

मुंबई : उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Ran) यांना जामीन मंजूर झालाय. महाडच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा जामीन मंजूर केला आहे. राणेंच्या जामिनानंतर आता भाजप नेत्यांकडून हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले जात आहे. तसेच भाजप नेते राज्य सरकारवर सडकून टीका करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी तर हे राज्य गुडांच्या मदतीने सुरु असल्याचा आरोप करत मंत्री अनिल परब यांना कोर्टात खेचणार असल्याचे सांगितले. राणे यांना अटक करण्यासाठी दबाव टाकला जात होता, अशी चर्चा सुरु झाल्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी वरील माहिती दिली. (Mahad court grant bail to Narayan Rane we will file case against Anil Parab said Chandrakant Patil)

भाजपने कंबर कसली, अनिल परब यांना कोर्टात खेचणार

नारायण राणे यांना अटक करावी असे आदेश दिले जात आहे. पोलिसांवर राजकीय दबाव आहे, असा आरोप भाजप नेते करत होते. भाजपच्या या दाव्यानंतर राज्याचे परिवहनमंत्री अनिल पबर यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये घेताय की नाही ताब्यामध्ये? ऑर्डर कसली मागतायेत ते? असे परब बोलताना दिसत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तसेच राणे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर भाजपने कंबर कसली असून भाजप अनिल परब यांना कोर्टात खेचणार आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले ?

“सत्ता अकृत्रिमपणे मिळवली त्या सत्तेची एवढी नशा कशाला. यांचं हम करेसो कायदा असं सुरु आहे. हे प्रत्येक विषयावर थपडा खातात. अनिल परब यांना आम्ही कोर्टात खेचणार. त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. याच आधारे आम्ही कोर्टात जाणार आहोत. एका मिनिस्टरला हे अधिकार दिले आहेत का ? सिक्रेट कॉल त्यांनी कव्हर केला. बाकी फोर्स वाढवा. काही करुन अटक करा. कसली ऑर्डर मागताय ? कशाला डिले करताय ? असं ते म्हणताना दिसतायत,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली आहे, असा आरोपदेखील त्यांनी केला.

नारायण राणे यांना जामीन मंजूर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलिसांनी अटक करण्यापूर्वी राणे यांनी रत्नागिरी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. तर मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानं राणेंचा आजचा मुक्काम पोलीस ठाण्यात होणार का? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केल्यामुळे राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अनिल परब नेमकं काय म्हणाले ?

अनिल परब यांना पोलिसांचा फोन होता. त्यांचं बोलणं पत्रकार परिषदेतील माईकमध्ये रेकॉर्ड होत होतं. मी सध्या रत्नागिरीत आहे. मी आता विचारुन घेतो सीएम साहेबांना. हो… फक्त मी ठरवतो, मग तसं आपल्याला ताबडतोब ब्रीफ करावं लागेल ना? हो हो हो… मग कोणाला सांगू ब्रीफ करायला? डीजींना सांगतो. मी डीजींना सांगतो. हो… ठिक आहे, मी आता डीजींना सांगतो ताबडतोब… ठिकाय मी आता ताबडतोब बोलतो.

त्या दरम्यान आमदार भास्कर जाधव हे मोबाईलमधील काहीतरी मेसेज अनिल परब यांना दाखवतात. भास्कर जाधव म्हणतात, कोर्टाने पण नकार दिलाय..

त्यानंतर काही वेळाने अनिल परब फोन लावतात.

हॅलो, काय करताय तुम्ही लोकं??

नाय पण ते करावं लागेल तुम्हाला.. तुम्ही.. घेताय की नाही ताब्यामध्ये?
हं
ऑर्डर कसली मागतायेत ते? ऑर्डर कसली मागतायेत ते?

अहो कोर्टाने जे काय आहे ते हायकोर्ट ते येणार नाही कॉन्फिडन्समध्ये

हायकोर्ट आणि सेशन कोर्ट दोघांनीही त्यांचा जामीन नाकारला आहे.

पण मग घ्या ना,,, पोलीस फोर्स वापरुन करा… अहो वेळ लागणार मग कोर्टबाजी चालूच आहे ना त्याची

ठिकाय.. ओके

फोन बंद झाल्यानंतर भास्कर जाधव अनिल परबांना म्हणतात, नारायण राणेला ताब्यात घेतलाय वाटतं..

मग अनिल परब भास्कर जाधवांना म्हणतात, घरात बसलाय, पोलिसांनी वेढा घातलाय, पोलीस आतमध्ये गेले तेव्हा धक्काबुक्की झाली
आता पोलीस ओढून बाहेर काढतायेत..

भास्कर जाधव म्हणतात.. चला आता (पत्रकार परिषद) संपवायला हवं.

त्यादरम्यान पत्रकार अनिल परब यांना विचारतात, नारायण राणे यांना अटक झाली आहे का?

त्यावर अनिल परब म्हणतात.. मला अजून त्याबाबतची माहिती मिळालेली नाही, त्यामुळे मी आता सांगू शकत नाही अटक झाली की नाही.
मी इथे तुमच्यासमोर बसून आहे. मी तुम्हाला त्याबाबत काय सांगू.

इतर बातम्या :

Narayan Rane Arrest : नारायण राणे यांना मोठा दिलासा, न्यायदंडाधिकाऱ्यांकडून जामीन मंजूर, आता राणे काय भूमिका घेणार?

Narayan Rane news Live : नारायण राणे यांना जामीन मंजूर 

Breaking : खासदार विनायक राऊतांच्या घरावर अज्ञातांनी सोडा बॉटल फेकल्या! बाईकवरुन आलेले चौघे पळून जाण्यात यशस्वी

(Mahad court grant bail to Narayan Rane we will file case against Anil Parab said Chandrakant Patil)