महाराष्ट्राची विधानसभा उद्याच भंग, लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : महाराष्ट्राची विधानसभा उद्याच भंग होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची उद्या अचानक बैठक आयोजित करण्यात आली असल्यने राजकीय वर्तुळात विधानसभा भंग होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज्याची विधानसभा भंग करुन, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता बळावली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता असून, मुंबईत मंत्रालयात या संदर्भात दबक्या आवाजात चर्चा […]

महाराष्ट्राची विधानसभा उद्याच भंग, लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका?
Maharashtra MLA List
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राची विधानसभा उद्याच भंग होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची उद्या अचानक बैठक आयोजित करण्यात आली असल्यने राजकीय वर्तुळात विधानसभा भंग होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज्याची विधानसभा भंग करुन, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता बळावली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता असून, मुंबईत मंत्रालयात या संदर्भात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहेत. शिवाय, एकत्र निवडणुकीसाठी भाजपकडून चाचपणीही सुरु असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

गेल्या सहा दिवसांपासून सरकारच्या वरिष्ठ पातळीवर विधानसभा एकत्र घेण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुप्तचर खात्याच्या वरिष्ठ सूत्रांनी याबाबत माहिती दिली. भाजपचा लोकसभेबरोबर विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतल्याची माहिती असून, भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना मतदारसंघांसाठी सरासरी 10 कोटींचा निधी गेल्या काही दिवसात दिला गेला. शिवाय, राज्यातल्या अनेक मोठ्या कामांच्या उद्घाटनांचा गेल्या दहा दिवसात सपाटा लावण्यात आला आहे.

काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

विधानसभा बरखास्तीचा सरकारचा डाव असल्यास तो राजकीय संधिसाधू वृत्तीने जनतेचा विश्वासघात असेल‌.1999 साली भाजप सेनेने मुदतपूर्व निवडणुकांचा निर्णय घेतला त्यावेळेस जनतेने जसे ठोकले तसेच आता ठोकल्याशिवाय राहणार नाही. एकत्र निवडणुकांना सामोरे जाण्यास काँग्रेस पक्ष पूर्णपणे सज्ज आहे. – सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते

2014 साली महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल कसा होता?

  • भारतीय जनता पार्टी: 122
  • शिवसेना: 63
  • काँग्रेस: 42
  • राष्ट्रवादी काँग्रेस: 41
  • बहुजन विकास आघाडी: 3
  • शेतकरी कामगार पक्ष: 3
  • ऑल इंडिया मजलिसे-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM): 2
  • भारिपा बहुजन महासंघ: 1
  • मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी: 1
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना: 1
  • राष्ट्रीय समाज पक्ष: 1
  • समाजवादी पार्टी: 1
  • अपक्ष: 7
  • विधानसभेच्या एकूण जागा – 288

दरम्यान, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आपापल्या नियोजित काळानुसारच होतील, असे यआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत काय होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.