Maharashtra News Live Update : बिग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण

Maharashtra News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : बिग बी अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण
Big breaking
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Aug 24, 2022 | 2:48 AM

आज दिनांक 23 ऑगस्ट 2022 (23 August 2022) जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी (Maharashtra News Live Update). आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. अधिवेशनाचे तिनही दिवस वादळी ठरले आहेत. त्यामुळे चौथा दिवस देखील वादळी ठरण्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. दुसरीकडे आज महाराष्ट्राच्या सत्तासंर्घषणावर सुनावणी देखील आहे. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागल आहे. राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र काही भागात अजूनही पाऊस सुरूच आहेत. जाणून घेऊयात राज्यातील प्रत्येक अपडेटस (Maharashtra Breaking News Live) शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर पक्षाला लागलेली गळती काही थांबण्याचे नाव घेत नाहीये आता शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. माजी आमदार अशोक पाटील यांनी शिंदे गटला समर्थन दिले आहे.