AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?

ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?

| Updated on: Sep 28, 2026 | 5:04 PM
Share

ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे पदाधिकारी सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण करण्यात आली. अभंगे यांच्यावर महिलांकडून प्रत्येकी ५०० रुपये मागितल्याचा आरोप आहे. गणेशोत्सवादरम्यान रस्त्यावरील दुकानदारांच्या तक्रारीवरून हा वाद सुरू झाला. पोलिसांसमोर घडलेल्या या घटनेत गुन्हा दाखल न केल्याचे वृत्त आहे.

ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात शिंदे सेनेचे पदाधिकारी सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. अभंगे यांच्यावर महिलांकडून प्रत्येकी ५०० रुपये मागितल्याचा आरोप आहे. हा प्रकार पोलीस ठाण्यातच पोलिसांच्या समक्ष घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धू अभंगे आणि त्यांची पत्नी व मुले गणेशोत्सवादरम्यान रस्त्यावर दुकान लावून बसलेल्या विक्रेत्यांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी कोपरी पोलीस ठाण्यात आले होते. या विक्रेत्यांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे अभंगे यांचे म्हणणे होते. याच वादातून संतप्त महिलांनी पोलीस ठाण्यातच अभंगे आणि त्यांच्या पत्नीला जबर मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे, ही सर्व मारहाण पोलिसांच्या समोर घडली असूनही, या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तसेच, पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Published on: Sep 28, 2026 05:04 PM

Follow Us