शाब्बास पठ्ठ्यांनो! राणेंच्या बंगल्याबाहेर जाऊन ताकद दाखवणाऱ्या युवासैनिकांना उद्धव ठाकरेंची शाबासकी

युवासेना सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या नेतृत्त्वात युवासैनिकांनी थेट नारायण राणे यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं. आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचं आव्हान स्वीकारुन वरुण सरदेसाई हे कार्यकर्त्यांसह त्यांच्या घराबाहेर जाऊन घोषणाबाजी केली.

शाब्बास पठ्ठ्यांनो! राणेंच्या बंगल्याबाहेर जाऊन ताकद दाखवणाऱ्या युवासैनिकांना उद्धव ठाकरेंची शाबासकी
Yuva sena
| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 9:25 AM

मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी (Yuva Sena) मंगळवारी मुंबईत चांगलाच राडा घातला. युवासेना सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या नेतृत्त्वात युवासैनिकांनी थेट नारायण राणे यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं. आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचं आव्हान स्वीकारुन वरुण सरदेसाई हे कार्यकर्त्यांसह त्यांच्या घराबाहेर जाऊन घोषणाबाजी केली.

यावेळी युवासेना आणि राणे समर्थकांमध्ये प्रचंड धुमश्चक्री झाली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरा समोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला. यावेळी युवासेनेचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झाले.

दरम्यान, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली. यावेळी ‘शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईल आंदोलन करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केलं.’

मुंबईत अनेक ठिकाणी गुन्हे

मुंबईत विविध ठिकाणी राणा आणि दगडफेकप्रकरणी काल तीन गुन्हे दाखल झाले आहेत. सांताक्रुज पोलिस ठाण्यात 2 तर कस्तूरबा मार्ग पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा असे एकूण 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वरुण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात आंदोलन 

केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुंबईत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे कार्यकर्ते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहूतील निवासस्थानी जमले होते. यावेळी वरुण सरदेसाई यांनी आक्रमक शैलीत राणे कुटुंबीयांना आव्हान दिले. नितेश राणे यांनी आम्हाला इकडे येऊन दाखवा, असे आव्हान दिले होते. आम्ही उंदराच्या बिळासमोर आलो आहोत. पण त्यांनी काय केलं?, असा सवाल विचारत वरुण सरदेसाईंनी नितेश राणे यांना प्रतिआव्हान दिले.

संबंधित बातम्या 

सिंहाच्या नव्हे उंदराच्या बिळाखाली येऊन दाखवलं, तुम्ही काय केलंत; राणेंच्या घरासमोर उभं राहून वरुण देसाईंचं ओपन चॅलेंज

मुंबईत वरुण सरदेसाईंच्या मोर्चावर पोलीसांचा लाठीमार, राणेंच्या घरासमोर राडा, कार्यकर्ते भिडले

Varun Sardesai: कोण आहेत वरुण सरदेसाई ज्यांनी राणेंच्या विरोधात मुंबईत रणशिंग फुंकलंय? वाचा सविस्तर