Varun Sardesai: कोण आहेत वरुण सरदेसाई ज्यांनी राणेंच्या विरोधात मुंबईत रणशिंग फुंकलंय? वाचा सविस्तर

भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले आहेत. युवा सेनेचे नेते वरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. (Varun Sardesai)

Varun Sardesai: कोण आहेत वरुण सरदेसाई ज्यांनी राणेंच्या विरोधात मुंबईत रणशिंग फुंकलंय? वाचा सविस्तर
Varun Sardesai
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 11:56 AM

मुंबई: भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले आहेत. युवा सेनेचे नेते वरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे जुहू परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. वरुण सरदेसाई यांनी या पूर्वीही राणे पिता-पुत्रांविरोधात रणशिंग फुंकले होते. आताही सरदेसाई राणे कुटुंबीयांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. कोण आहेत वरुण सरदेसाई? त्यावर टाकलेला हा प्रकाश. (who is Yuva Sena secretary Varun Sardesai, all you need to know about him)

वरुण सरदेसाई आदित्य ठाकरेंचे मावसभाऊ

वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेच्या सचिव पदाची जबाबदारी आहे. ते पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ लागतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या भगिनीचे ते पुत्र आहेत. वरुण यांच्याकडे युवासेनेच्या सचिवपदासह शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. वरुण सरदेसाई हे पेशाने सिव्हिल इंजिनिअर आहेत.

आदित्य ठाकरेंचे स्टार प्रचारक

आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवाली अशी जाहीर मागणी सर्वप्रथम वरुण यांनीच केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता. 2017 मधील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदेंसाठी त्यांनी प्रचार केला होता. विशेष म्हणजे वरुण सरदेसाई गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यताही वर्तवली जात होती. गेल्या वेळी मुंबई सिनेट निवडणुकीच्या युवासेनेच्या व्यूहरचनेत वरुण सरदेसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सर्व 10 जागा जिंकून युवासेनेने विक्रम रचला होता.

वाय प्लस दर्जाची सुरक्षा

राज्यातील महत्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. मात्र, त्याचवेळी वरुण सरदेसाई यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यावरुनही नितेश राणे यांनी शिवसेनेवर आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला होता.

नितेश राणेंशी जुनाच वाद

यापूर्वीही नितेश राणे आणि वरुण सरदेसाई यांच्यात वाद रंगला होता. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बेटिंगचं रॅकेट चालतं. या सगळ्या बेटिंगवाल्यांना सचिन वाझे यांनी फोन केला होता आणि त्यांच्याकडे मोठ्या खंडणीची मागणी केली होती, असा आरोप नितेश राणे यांनी केला होता. सचिन वाझेंकडून बेटिंगवाल्यांना धमकावण्यात आलं. त्यांच्यावरील छापा किंवा अटक टाळायची असेल तर तुम्हाला 150 कोटी रुपये द्यावे लागतील अशी मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला होता. सचिन वाझे यांनी बेटिंगवाल्यांना फोन केल्यानंतर वाझे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक असलेले वरुण सरदेसाई यांचा फोन जातो. तुम्ही बुकींकडे जे पैसै मागितले त्यातील आमचा हिस्सा किती? असं सरदेसाई यांनी वाझेंना विचारल्याचा म्हणजे एकप्रकारे खंडणी मागितल्याचा आरोप राणेंनी केला आहे. या प्रकरणात आता थेट वरुण सरदेसाई यांचं नाव आल्यामुळे मोठी खळबळ माजली होती. या आरोपांमुळे सरदेसाई चर्चेत आले होते. मात्र, वरुण सरदेसाई यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

राणेंचं आताचं विधान काय?

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. (who is Yuva Sena secretary Varun Sardesai, all you need to know about him)

संबंधित बातम्या:

मग त्यावेळेस मुख्यमंत्र्यांवर गुन्हा का दाखल झाला नाही? राणे म्हणतात, मी क्रिमिनल ऑफेन्स केलाच नाही

Narayan Rane : नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपचं कार्यलय फोडलं, सांगलीत राणेंच्या पोस्टरवर शाईफेक

उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं? पाटलांचा राणे प्रकरणावर प्रती सवाल

(who is Yuva Sena secretary Varun Sardesai, all you need to know about him)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.