AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मग त्यावेळेस मुख्यमंत्र्यांवर गुन्हा का दाखल झाला नाही? राणे म्हणतात, मी क्रिमिनल ऑफेन्स केलाच नाही

केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटले असून शिवसैनिक आणि युवा सेनेचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. (narayan rane addresses media over his comments on cm uddhav thackeray)

मग त्यावेळेस मुख्यमंत्र्यांवर गुन्हा का दाखल झाला नाही? राणे म्हणतात, मी क्रिमिनल ऑफेन्स केलाच नाही
केंद्रीय मंत्री नारायण राणे
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 10:40 AM
Share

चिपळूण: केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटले असून शिवसैनिक आणि युवा सेनेचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. तसेच दुसरीकडे गुन्हे दाखल झाल्याने राणे यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचं मला माहीत नाही. तुम्ही म्हणताय म्हणून मी मान्य करणार नाही. तुम्ही माहिती घ्या, असं सांगतानाच मी जे काही बोललो तो क्रिमिनल ऑफेन्स नाही, असं नारायण राणे म्हणाले. (narayan rane addresses media over his comments on cm uddhav thackeray)

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया व्यक्त केली. पत्रकार परिषद घेण्यापूर्वी नारायण राणे यांनी त्यांचे वकील अॅड. संजय चिठणील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मला तुम्हाला सांगायचं आहे, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा, मग आपआपल्या टीव्हीवर दाखवा, नायतर तुमच्याविरोधात माझी केस दाखल होईल. गुन्हा दाखल नसताना, उगाच अटक होणार वगैरे काय नॉर्मल माणूस वाटलो काय तुम्हाला?, असा सवाल राणे यांनी केला.

दोन दगड मारणं हा पुरुषार्थ नाही

माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला हे कोणाचं म्हणणं आहे, शिवसेना वगैरे म्हणता, नाव सांगा कोण शिवसेना. एखाद्या नेत्याचं नाव सांगा. कोण सुधाकर बडगुजर मी ओळखत नाही. माझी बदनामी करायला घेतली तर माझा गुन्हा तुमच्याविरोधात दाखल करणार आहे. मी सारखं पाहतो. हे निघालं ते निघालंय… काय चाललं नाही. मी तुमच्या बातमीवर, सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही. आम्ही समर्थ आहोत. दोन दगड मारले हा पुरुषार्थ होत नाही. त्यांना जे काही करायचं ते करू दे. काय पुरुषार्थ आहे ते पाहू, असंही ते म्हणाले.

जर-तरला अर्थ नसतो

उद्धव ठाकरे लाडला फोडा म्हणाले. तो गुन्हा नाही का? 15 ऑगस्ट हा वर्धापन दिन माहीत नाही. मुख्यमंत्री असताना त्यांनी सचिवांना विचारलं. ते विधान करताना ‘मी असतो तर’ असं मी म्हणालो. असतो तरला अर्थ नाही. देशाचा अमृत महोत्सव माहीत नाही. हा देशाचा अपमान आहे. राष्ट्रद्रोह आहे, असं ते म्हणाले.

आमचंही सरकार वर आहे

नोटीस आणि लेटरमध्ये फरक आहे. आदेश काढायला तो काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे. मी जे बोललो तो क्रिमिनल ऑफेन्स नाही. पोलिसांची तत्परता आदेशामुळे आहे. आमचंही सरकार वर आहे. पाहू ते कुठपर्यंत उडी मारतात ते. मी कुणालाही जुमानत नाही. आम्ही अधिक आक्रमक आहोत. आज ऑफिस तोडलं, उद्या आम्ही त्यांच्या घरापर्यंत गेलो तर? बघू मी रस्त्याने जाणार आहे. मी प्रॅक्टिल वकील आहे. 52 वर्षे राजकारणात आहे. सर्व सेक्शन माहीत आहे. गुन्हा कधी होतो तो माहीत आहे, असंही ते म्हणाले.

राणे नेमंक काय म्हणाले होते?

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. (narayan rane addresses media over his comments on cm uddhav thackeray)

संबंधित बातम्या:

“कोंबडी चोर !!!” नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांचा संताप, दादरमध्ये डिवचणारे पोस्टर

Narayan Rane : नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपचं कार्यलय फोडलं, सांगलीत राणेंच्या पोस्टरवर शाईफेक

नारायण राणेंना अटक करुनच दाखवा, तुमच्यात हिंमत नाही, भाजपने ठाकरे सरकारला पुन्हा ललकारलं

(narayan rane addresses media over his comments on cm uddhav thackeray)

महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.