गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने नकारात्मकता नष्ट होते, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचे वक्तव्य

| Updated on: Jan 12, 2020 | 1:38 PM

गायीच्या पाठीवरून हात फिरवल्याने आपण विसरुन जातो. हा चमत्कार आहे. हे सर्व आपल्या संस्कृतीमध्ये सांगितले आहे." असेही यशोमती ठाकूर (Yashomati thakur statement) म्हणाल्या

गायीच्या पाठीवर हात फिरवल्याने नकारात्मकता नष्ट होते, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचे वक्तव्य
Follow us on

अमरावती : “आपल्यातील नकारात्मक विचार गाईच्या दर्शनाने किंवा गायीवर हात फिरवल्याने आपण हे सगळं विसरुन जातो. हा चमत्कार आहे. हे सर्व आपल्या संस्कृतीमध्ये सांगितले आहे,” असे वक्तव्य महिला व बालकल्याण मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी (Yashomati thakur statement) केलं.

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील सार्शी येथे गावाचे दैवत समजल्या जाणाऱ्या एका मृत गाईच्या पुण्यतिथी निमित्ताने गावात सात दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी समारोपीय कार्यक्रमाला मार्गदर्शन भाषणादरम्यान हे वक्तव्य केलं.

“पर्सनॅलिटी डेवलपमेंटची खूप सारे कोर्स येतात. अनेक मोठे मोठे लोक प्रशिक्षण घेतात यासाठी मोठ्या प्रमाणात पैसाही घेतला जातो. मात्र यामुळे आपण आपली संस्कृती विसरतो. आपल्यामधील जे नकारात्मक विचार आहेत ते गाईच्या दर्शनामुळे, गायीच्या पाठीवरून हात फिरवल्याने आपण विसरुन जातो. हा चमत्कार आहे. हे सर्व आपल्या संस्कृतीमध्ये सांगितले आहे.” असेही यशोमती ठाकूर (Yashomati thakur statement) म्हणाल्या

“निव्वळ राजकारणासाठी आपण राजकारण करतो. आपण जे काम करतो त्याला धर्म मानतो. आपण जे विचार करतो त्याला धर्म म्हणतो. सातत्याने विठ्ठलाचे नामस्मरण केले तर आपल्या आकांक्षा इच्छा पूर्ण होतात. मात्र विठ्ठलाच्या पाया पडणे म्हणजे झालं असं नाही.” असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

“आज तरुण युवकांना वेगवेगळ्या पदावर जायचं आहे. स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. यासाठी आपण विठ्ठलाच्या नामस्मरण केले पाहिजे,” असेही यशोमती ठाकूर (Yashomati thakur statement) म्हणाल्या.