
मुंबई: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारचा 1 जुलैला शपथविधी पार पडणार! काल उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि सगळी राजकीय गणितं बदलली. मला हा फ्लोअर टेस्टचा खेळ खेळायचाच नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह करत मुख्यमंत्रीच काय तर आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिला. दरम्यान नवं सरकार कसं असेल? कुणाला मंत्रिपद मिळेल याबाबत चर्चा सुरु असतानाच सूत्रांकडून एक महत्त्वाची बातमी हाती आलीये. देवेंद्र फडणवीस सरकारचा 1 जुलैला शपथविधी (Swearing In Ceremony) पार पडणार आहे. भाजपकडून (BJP) आजच सत्तास्थापनेचा दावा केला जाणारे अशीही माहिती सूत्रांनी दिलीये. सागर बंगल्यावर यासंदर्भात भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार हे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचं कळतंय.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी महत्वाचं ट्विट आहे. “भाजपसोबत मंत्रिपदांबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका”, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून शिंदे गटाच्या आमदारांसह राज्यातील जनतेला केलं आहे. मंत्रिपदं, खातेवाटप आणि भाजपसोबतची चर्चा याविषयी एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. “भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका”, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलंय.
भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 30, 2022
सागर बंगल्यावर सत्तास्थापनेसंदर्भात भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार हे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचं कळतंय.