Anil Parab on ST bus workers strike : सातवा वेतन आयोग आणि 10 वर्षाचा करार यावर विचार होऊ शकतो, पण संप मागे घ्या; अनिल परब यांची मोठी घोषणा

| Updated on: Nov 26, 2021 | 7:36 PM

विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम राहत राज्यातील अनेक भागात एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्यापही कायम आहे. अशावेळी अनिल परब आणि एसटी कर्मचारी कृती समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीत सातवा वेतन आयोग आणि 10 वर्षाचा करार यावर विचार होऊ शकतो, असं अनिल परब म्हणाले. तसंच संप मागे घ्या असं आवाहन परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा केलंय.

Anil Parab on ST bus workers strike : सातवा वेतन आयोग आणि 10 वर्षाचा करार यावर विचार होऊ शकतो, पण संप मागे घ्या; अनिल परब यांची मोठी घोषणा
अनिल परब, परिवहन मंत्री
Follow us on

मुंबई : एसटी कमचाऱ्यांच्या अंतरिम पगारवाढीची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केलीय. परबांच्या या घोषणेनंतर आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून माघार घेतली आहे. असं असलं तरी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम राहत राज्यातील अनेक भागात एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्यापही कायम आहे. अशावेळी अनिल परब आणि एसटी कर्मचारी कृती समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीत सातवा वेतन आयोग आणि 10 वर्षाचा करार यावर विचार होऊ शकतो, असं अनिल परब म्हणाले. तसंच संप मागे घ्या असं आवाहन परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा केलंय.

अनिल परब काय म्हणाले?

कृती समितीसोबत झालेल्या बैठकीनंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना परब म्हणाले की, पगारवाढ दिल्यानंतर संपाबाबत जो संभ्रम आहे, समज गैरसमजाबाबतही चर्चा झाली. जी आश्वासनं मी देतोय, काही जाचक अटी असतील त्यावर चर्चा झाली. कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार नाही. पण बेशिस्तही खपवून घेतली जाणार नसल्याचं त्यांना सांगितलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार यांच्या मदतीनं एसटी कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. विलिनीकरणाचा मुद्दा जो त्यांच्या डोक्यात आहे. सातवा वेतन आयोग द्या आणि करार 10 वर्षाचा करा अशीही मागणी आली. त्यावरही विचार केला जाऊ शकतो. पण आज महाराष्ट्र सरकार चार पावलं पुढे आलं आहे. भरघोस वेतनवाढ दिलीय. अशावेळी एका मुद्द्यासाठी जो मुद्दा सरकारच्या हातात नाही. त्यामुळे समितीच्या अहवालानंतरच विलिनीकरणावर निर्णय होईल. त्यामुळे एसटी सुरु करण्यासाठी, सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी, कर्मचाऱ्यांचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कामावर रुजू होण्याचं आवाहन मी केलं.

‘कामगार श्रेत्रात काम केल्यामुळे सगळ्या गोष्टींची जाणीव’

‘पगारवाढ दिल्यानंतर बरेच कामगार कामावर रुजू झाले आहेत. हे होत असताना एसटी कर्मचाऱ्यांची जी कृती समिती आहे तिच्याशी चर्चा करुन कामगारांचं म्हणणं, त्यांची मानसिकता यावर चर्चा झाली. एसटी सुरळीत करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली पगारवाढ ही मूळ वेतनात दिली असल्याचं त्यांच्या ग्रेडमध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात, त्याचा उल्लेख त्यांनी केला. मी कामगार श्रेत्रात काम केल्यामुळे त्याची जाणीव आहे. त्यामुळे त्याला कुठल्या ग्रेडमध्ये बसवायचं याचा निर्णय़ नंतर केला जातो. म्हणून मी त्यांना सांगितलं की संप ज्यावेळी संपेल त्यावेळी यावर विचार करु. कुठल्याही कामगारावर अन्याय होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ’

पैसे देऊनही संप चालू राहणार असेल तर…

सतत आर्थिक भार सोसत राहायचं आणि त्या बदल्यात एसटी बंद ठेवायची असंही होणार नाही. सरकारला विचार करावाच लागेल. पैसे देऊनही संप चालू राहणार असेल तर पैसे न दिलेले काय वाईट आहे. असा विचारही सरकार करु शकतं. कामगारांचं मागणं, त्यांचे हक्क अबाधित ठेवणं हे आमचं कामच आहे. त्यामुळे संप मिटला तर ज्या छोट्या मागण्या त्यांनी केल्या त्यावर नक्की विचार केला जाईल, असं आश्वासन देत असल्याचं परब यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

‘नारायण राणेंनी जरा जास्तच मुदत दिली, त्यांचे खास आभार’, जयंत पाटलांचा खोचक टोला

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : बिनविरोध निवड झाल्यानंतर सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया