Manoj Jarange Patil : शिंदेंवरील 500 कोटींच्या आरोपांनी मोठी खळबळ! मनोज जरांगेंच्या धक्कादायक दाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, नेता म्हणाला तुम्ही काय…

जरांगे यांनी मनात काही ठेवलं नाही. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. भाजप-शिवसेनेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करत आहेत, अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील माजी मंत्र्याने दिली.

Manoj Jarange Patil : शिंदेंवरील 500 कोटींच्या आरोपांनी मोठी खळबळ! मनोज जरांगेंच्या धक्कादायक दाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, नेता म्हणाला तुम्ही काय...
manoj jarange patil and eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2026 | 3:02 PM

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगडावर मोठा दसरा मेळावा झाला. या दसरा मेळाव्याला मराठा समाजातील लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, याच दसरा मेळाव्यात मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. मला 500 कोटी रुपये देण्यात आले आहेत, असं शिंदे यांनी भाजपाला सांगितले आहे, असा मोठा दावा जरांगे यांनी केलाय. या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. जरांगे यांच्या या आरोपांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून पहिली प्रतिक्रिया आली आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी यावर  भाष्य केलंय.

शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली

रामदास कदम यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपांवर भाष्य केले. “भाजपा शिवसेनेला संपवते आहे की शिवसेना बाजपाला संपवत आहे, हे असे मतभेद कशासाठी हवे आहेत. एकनाथ शिंदे यांनी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मराठा समाजाला मदत केलेली आहे,” असं विधान रामदास कदम यांनी केलं. तसेच माझी आपणाला विनंती आहे की, आपण मराठा समाजाचे आहात. कुठे काय कुजबूज होते आहे याकडे लक्ष देऊ नका. ज्याच्यात हिम्मत असेल तो बोलेल, त्यानंतर मग त्याला उत्तर द्या, असं आवाहनही कदम यांनी जरांगेंना केलं.

Loading...

शिंदे यांनी बंड केले तेव्हा…

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला मदद करत आहेत. आम्ही भाजपसोबत युती केली. शिवसेनाप्रमुखांचे ते स्वप्न होते. शिंदे यांनी बंड केले तेव्हा त्यांच्यासोबत 40 आमदार होते, आता 65 आमदार आहेत. एकनाथ शिंदे खंबीर आहेत. आपल्याला संपवण्याचे प्रयत्न केले तर आपण राजकारणात नवीन आहात का? असा सवालही कदम यांनी जरांगे यांना केला.

भाजप-शिवसेनेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न…

जरांगे यांनी मनात काही ठेवलं नाही. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. भाजप-शिवसेनेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. कोणावर किती विश्वास ठेवायचा मनोज जरांगे बघतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली

 मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

मनोज जरांगे यांनी शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे यांनी त्यांच्या आजच्या दसरा मेळाव्यात माझ्या आरोपांवर बोलावं, असं खुलं आव्हानही त्यांनी दिलं. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मला तुम्ही 500 कोटी रुपये दिले आहेत, असं तुम्ही भाजपाच्या लोकांना सांगितलं का? तुम्ही मला 500 रुपये दिले आहेत का? याचं स्पष्टीकरण द्यावं, असं आव्हान जरांगे यांनी शिंदे यांना केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us