चलो मुंबई… मराठा आंदोलनाचा संपूर्ण टाइम टेबल पाहा; कोणत्या तारखेला काय करायचं?

मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मुंबईतील आंदोलनाचे संपूर्ण टाईमटेबल जाहीर केले आहे. प्रवासात कुठे मुक्काम करायचा, सोबत कोणत्या वस्तू घ्यायच्या दिवसाचे किती तास चालायचे, सोबत कोणत्या वस्तू घ्यायच्या, रात्रीचा मुक्काम कुठे करायचा याचा सर्व तपशील या वेळापत्रकात दिला आहे.

चलो मुंबई... मराठा आंदोलनाचा संपूर्ण टाइम टेबल पाहा; कोणत्या तारखेला काय करायचं?
manoj jarange patil
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jan 15, 2024 | 1:53 PM

जालना | 15 जानेवारी 2024 : मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना येत्या 20 जानेवारीला चलो मुंबईची हाक दिली आहे. मराठ्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी ही शेवटची संधी आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना रजा टाका आणि मुंबईच्या दिशेने मिळेल ते वाहन घेऊन शांततेने चला असा आदेश मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला मोर्चा काढण्याच्या आंदोलनाचा संपूर्ण टाईम टेबल जाहीर झाला आहे. या कार्यक्रमात कोणत्या तारखेला नेमके काय करायचे याची विस्तृत माहीती आज मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथून जाहीर केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन वेळा आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी दोन वेळा मुदत वाढवून दिली आहे. आता मराठा तरुणांसाठी सरसकट आरक्षण पदरात पाडण्यासाठी सरकारला शेवटचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. यासाठी येत्या 20 जानेवारीला मोठ्या संख्येने मुंबईत जमण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. ही शेवटची संधी आहे. आता नाही तर कधीच आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे सर्व कामधाम बाजूला ठेवून मराठ्यांनी एकजूट दाखवावी तरच आरक्षण मिळेल असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. या 20 जानेवारीच्या मुंबईतील आंदोलनाचा मार्ग मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत जाहीर केला नव्हता. जरांगे यांनी मुंबई आंदोलनाचा मार्ग जाहीर केला असून या आंदोलना दरम्यान अंतरवाली सराटी ते मुंबई या प्रवासातील मुक्काम कुठे कुठे असणार आहे. या संदर्भात समाजाला माहीती देण्यासाठी संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अंतरवाली ते मुंबई प्रवासाचे मुक्कामाचे टप्पे खालील प्रमाणे असणार आहेत.

अंतरवली ते मुंबई प्रवासातील मुक्कामाचे टप्पे असे असणार

सकाळी 9 वाजल्यापासून 12 पर्यत चालत निघायचे

20 जाने सकाळी 9 वाजता अंतरवलीमधून निघायचे

20 जानेवारी पहिला मुक्काम- शिरूर(बीड) तालुक्यातील मातोरी डोंगर पट्ट्यात

ज्याला जमेल त्याने चालायचे, नाहीतर बिनधास्त गाडीमध्ये बसायचे

दुपारी 12 पर्यंतच सर्वांनी चालायचे आहे

21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी-(अ. नगर)

22 जानेवारी तिसरा मुक्काम-रांजणगाव-(पुणे जिल्हा)

23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास,पुणे

24 जानेवारी पाचवा मुक्काम- लोणावळा

25 जानेवारी 6 वा. मुक्काम – वाशी, नवी मुंबई

26 जानेवारी 7 वा. मुक्काम आझाद मैदान आंदोलन स्थळी

शिवाजी पार्क आणि आझाद मैदान आम्हाला दोन्ही मैदान लागतील

मनोज जरांगे 26 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार

प्रत्येक जिल्ह्यातील बांधवांनी त्यांच्या हद्दीपर्यंत चालायचे आहे

पुण्यामध्ये मराठा समाजाच्या करोडोचा आकडा असणार

सर्व प्रकारची वाहने मुंबईकडे जाताना असणार आहेत

मुंबई जाणारे प्रत्येकजण आपल्या वस्तू सोबत घेणार आहेत

झोपताना आपल्या वाहनाजवळ झोपायचे आहे

मुंबई जाताना कुणीही व्यसन करायचे नाही

मुबई जाताना प्रत्येक जणांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे

ज्यांच्याकडे पाण्याचे टँकर असेल, जनरेटर असेल घेऊन या

आपण आपल्या लोकांची सेवा करायची आहे

आता लेकरासाठी मुंबईला जायचे आहे

टीव्हीवर चमकण्यासाठी स्टंटबाजी करू नये

मनोज जरांगे यांनी कार्यकर्त्यांना आपल्या सोबत खाण्या पिण्याच्या वस्तू  घ्यायच्या आहेत, आपण एकटे निघणार आहे, मग सोबत एक लाख असो की एक कोटी. आपण रोज पायी बारा वाजेपर्यंत चालायचे आहे आणि नंतर मुक्कामी पोहचायचे आहे. 90 ते 100 किलोमीटरवरच्या आत मुक्काम असणार आहे.  सरकारला आता वेळ द्यायचा नाही. आम्ही पुण्यात दोन दिवस आहोत आणि आम्हाला पुणे बघायचे आहे,
सर्व मराठा शंभर टक्के मुंबई जाणार आहे. आंदोलनाला कोणी गाल बोट लावत असेल तर त्याला पोलिसांचा ताब्यात द्यायचे
मुंबई जाताना tv वर दिसण्यासाठी कोणीही स्टंट करायचा नाही असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.