शहीद जवान औरंगजेबच्या वडिलांचा भाजपात प्रवेश

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शहीद जवान औरंगजेबच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. गेल्या वर्षी जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये औरंगजेबचं अपहरण करुन हत्या केली होती. औरंगजेब ईदसाठी गावी निघाला असता बसमधून त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर त्याची हत्या करुन मृतदेह दहशतवाद्यांनी रस्त्यावर फेकला. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये एका सभेला संबोधित केलं. […]

शहीद जवान औरंगजेबच्या वडिलांचा भाजपात प्रवेश
Follow us on

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शहीद जवान औरंगजेबच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. गेल्या वर्षी जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये औरंगजेबचं अपहरण करुन हत्या केली होती. औरंगजेब ईदसाठी गावी निघाला असता बसमधून त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर त्याची हत्या करुन मृतदेह दहशतवाद्यांनी रस्त्यावर फेकला.

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये एका सभेला संबोधित केलं. याच सभेत औरंगजेबचे वडील मोहम्मद हनीफ यांनी भाजपात प्रवेश केला. मोहम्मद हनीफ यांच्यासोबतच भारतीय सैन्यातील माजी अधिकारी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राकेश कुमार शर्मा यांचंही मोदींनी भाजपात स्वागत केलं. हनीफ यांनी त्यांच्या शहीद मुलाचा फोटो मोदींना भेट दिला.

रायफलमॅन औरंगजेबची दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यात अपहरण करुन हत्या केली होती. औरंगजेबचा मरणोत्तर शौर्यचक्र देऊन सन्मान करण्यात आला. गरीबांसाठी दिलासादायक धोरणांमुळे मी भाजपात सहभागी होत आहे. मोदींचं सरकार देशात सर्वोत्कृष्ट आहे. यापूर्वीच्या सरकारने गरीबांच्या हिताचा विचार केला नाही, असं हनीफ म्हणाले.

जम्मू आणि काश्मीर विधानसभेसाठीही लोकसभेसोबतच निवडणूक होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या सहा, तर विधानसभेच्या 87 जागा आहेत. भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जम्मू काश्मीरमधील सहापैकी तीन जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मोदींनी जम्मू काश्मीरमध्ये विविध योजनांचा शुभारंभ करत प्रचाराचाही नारळ फोडला आहे.