Maharashtra politics : दिल्लीत शाह, फडणवीस, शिंदेंमध्ये खलबतं; तब्बल सव्वचार तास बैठक, खाते वाटपाचा गुंता वाढण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची देखील उपस्थिती होती. सव्वाचार तासांच्या या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.

Maharashtra politics : दिल्लीत शाह, फडणवीस, शिंदेंमध्ये खलबतं; तब्बल सव्वचार तास बैठक, खाते वाटपाचा गुंता वाढण्याची शक्यता
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 09, 2022 | 7:03 AM

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. शुक्रवारी रात्री जवळपास सव्वाचार तास अमित शाह, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये खलबतं झाली. त्यानंतर रात्री दोन वाजता अमित शाह यांच्या घरातून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे बाहेर पडले. या बैठकीमध्ये मंत्रीपदाचे वाटप आणि शिवसेनेने नव्या सरकारविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 11 तारखेला सुनावणी आहे. त्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गट आणि भाजपमधील काही आमदार हे विशिष्ट मंत्रीपदासाठी आग्रही असल्याने खाते वाटपाचा गुंता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बैठकीत नेमकी चर्चा कशावर?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. या दौऱ्यात त्यांनी पहिल्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे चर्चेला जाताना आणि बैठक संपल्यानंतर बाहेर पडताना दोघे एकत्र बाहेर पडले नाहीत. बैठक सुरू होण्याच्या आधीच देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांच्या घरी होते. नंतर एकनाथ शिंदे हे शाह यांच्या घरी आले. तर चर्चा झाल्यानंतर देखील आधी एकनाथ शिंदे हे शाह यांच्या घरातून बाहेर पडले.  या बैठकीमध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार, कोणाला कोणते खाते द्यावे? तसेच येत्या 11 तारखेला शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी आहे, या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

मंत्रीपदावरून नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या आधीच राजीनामा दिला. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपाने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. एकनाथ शिंदे यांना अनअपेक्षित मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नव्या सरकारने विश्वासदर्शक ठराव देखील जिंकला मात्र आता मंत्री पादाच्या वाटपावरून घोडं आडण्याची शक्यता आहे. शिंदे गट आणि भाजपामधील अनेक आमदार मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. तर काही आमदार हे आपल्याला विशिष्ट खातेच मिळावे यावर आडून बसले आहेत. त्यामुळे मंत्रीपदावरून नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे.