संजय राठोड सर्व मंत्र्यांच्या संपर्कात, योग्य वेळ येताच माध्यमांसमोर येतील – गृहराज्यमंत्री

| Updated on: Feb 19, 2021 | 7:27 PM

संजय राठोड आता लवकरच माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संजय राठोड सर्व मंत्र्यांच्या संपर्कात, योग्य वेळ येताच माध्यमांसमोर येतील - गृहराज्यमंत्री
Follow us on

कराड : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड अद्याप समोर आलेले नाहीत. त्यावरुन विरोधकांनी सरकारला आणि खास करुन शिवसेनेला चांगलंच धारेवर धरलं आहे. संजय राठोड कधी समोर येणार? असा प्रश्न विरोधकांसह माध्यम प्रतिनिधीही विचारत आहेत. या प्रश्नाचं उत्तर आता गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिलं आहे. संजय राठोड हे सर्व मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. योग्य वेळ येताच ते माध्यमांसमोर येतील, असं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्यामुळे संजय राठोड आता लवकरच माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Shambhuraj Desai informed that Sanjay Rathod will appear before the media at the right time)

‘महाराष्ट्रात सर्वसामान्य सुरक्षित नाहीत हे तर दिसतच होतं. पण आता मंत्री महोदय 10 दिवस गायब असतात. कुणालाच सापजत नाहीत. यापेक्षा राज्याची वाईट अवस्था काय असू शकते? अहो रोज तुमच्यासोबत बसणारा सहकारी मंत्री 11 दिवस गायब आहे. त्याला तरी शोधा’, असं ट्वीट करत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना टोला लगावला होता.

अजित पवारांचं मिश्किल उत्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही आज पत्रकारांनी संजय राठोड यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी संजय राठोड यांची भेट झाली तर सांगेन की सर्व पत्रकार तुमची आत्मितयेतेने वाट बघत आहेत. त्यांची एकदा भेट घ्या, असं मिश्किल उत्तर अजितदादांनी दिलं. तसंच या प्रकरणात पोलीस योग्य तपास करतील आणि सत्य समोर आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. इतकच नाही तर एकेकाळी एखादा आरोप झाल्यावर लोकप्रतिनिधी पदाचा राजीनामा द्यायचे. पण आता तो काळ राहिला नसल्याचं अजितदादा म्हणाले.

दरम्यान, संजय राठोड यांच्याबाबत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. संजय राठोड हे सर्व मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. ते योग्यवेळी माध्यमांसमोर येतील असा दावाही देसाई यांनी केला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संजय राठोड यांची पाठराखण केली आहे. संजय राठोड गायब नाहीत. आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे ही वस्तुस्थिती आहे. यापूर्वी धनंजय मुंडेंबाबतीत असंच घडलं, आरोप झाल्यावर राजीनामा घेतला असता तर त्यांची स्वत:ची बदनामी झाली असती. नंतर आरोप करणाऱ्या व्यक्तीने तक्रार मागे घेतली, असं अजित पवार गुरुवारी म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

संजय राठोड नॉटरिचेबल, पण वन मंत्रालयाचं कामकाज सुरू

संजय राठोड यांची भेट झाली तर सांगेन पत्रकार तुमची वाट बघतायत : अजित पवार

Shambhuraj Desai informed that Sanjay Rathod will appear before the media at the right time