वेळेला आणि वेळेच्या शेवटी आम्ही दोघे कायम सोबत : मुंडे

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

बीड : एरवी राजकारणाच्या रणांगणात एकमेकांवर तुफान हल्लाबोल करणारे मुंडे भाऊ-बहीण काल बीडमध्ये एकाच व्यासपीठावर दिसले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे ही भावंडं परीळीतील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिरात गुरुवर्य आबासाहेब वाघमारे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ही भावंडं एकत्र आले होते. आमदार गणपतराव देशमुख या कार्यक्रमाचे अध्यक्ष […]

वेळेला आणि वेळेच्या शेवटी आम्ही दोघे कायम सोबत : मुंडे
Follow us on

बीड : एरवी राजकारणाच्या रणांगणात एकमेकांवर तुफान हल्लाबोल करणारे मुंडे भाऊ-बहीण काल बीडमध्ये एकाच व्यासपीठावर दिसले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे ही भावंडं परीळीतील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिरात गुरुवर्य आबासाहेब वाघमारे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ही भावंडं एकत्र आले होते. आमदार गणपतराव देशमुख या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे प्रमुख पाहुणे होते.

“मी शाळेतील सर्वात चांगली मुलगी होती. म्हणून मी कार्यक्रमालाही लवकर आले.”, असे यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या आणि भाषण संपल्यावर काही इतर कार्यक्रमानिमित्त त्या निघून गेल्या. यावर बंधू धनंजय मुंडे यांनी मात्र पंकजा मुंडेंना टोमणा मारला. “शाळेतील  सर्वात चांगली मुलगी कार्यक्रमातून लवकर निघून जातात.” असे धनंजय मुंडे म्हणाले. त्यावर उपस्थितांमध्येच एकच हशा पिकला.

“काहीही असो, वेळेला आणि वेळेच्या शेवटी आम्ही दोघे कायम सोबत असतो.”, असे सांगायलाही धनंजय मुंडे विसरले नाहीत.

बीडमधील राजकारणाचं केंद्र – ‘मुंडे’

आपल्या सगळ्यांना माहितच आहे की, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे भाऊ-बहीण आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे बंधू पंडीतअण्णा मुंडे यांचे धनंजय मुंडे हे सुपुत्र. दिवंगत गोपीनाथ मुंडे हयात असतानाच धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हापासून मुंडे घरात दोन गट निर्माण झाले. आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे मुंडे कुटुंबातील पुढच्या पिढीचे दोन्ही वारसदार एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू आहेत. बीडमधील राजकारणही या दोन्ही भावंडांच्या गोल फिरताना दिसते.