मंत्री उदय सामंत पहिल्याच दौऱ्यात नाराज भास्कर जाधवांच्या घरी!

| Updated on: Jan 06, 2020 | 11:20 AM

राज्याचे नवनियुक्त उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या पहिल्याच दौऱ्यात शिवसेनेचे नाराज नेते आणि आमदार भास्कर जाधव यांची भेट घेतली (Uday Samant meet Bhaskar Jadhav).

मंत्री उदय सामंत पहिल्याच दौऱ्यात नाराज भास्कर जाधवांच्या घरी!
Follow us on

रत्नागिरी : राज्याचे नवनियुक्त उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या पहिल्याच दौऱ्यात शिवसेनेचे नाराज नेते आणि आमदार भास्कर जाधव यांची भेट घेतली (Uday Samant meet Bhaskar Jadhav). भास्कर जाधव यांच्या राहत्या घरी जवळपास अर्धातास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या भास्कर जाधवांचं मन वळवण्यासाठी ही भेट होती का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे (Uday Samant meet Bhaskar Jadhav).

उदय सामंत आणि भास्कर जाधव हे रत्नागिरीच्या राजकारणातील दोन राजकीय प्रतिस्पर्धी. उदय सामंत हे राष्ट्रवादीत असल्यापासून ते अगदी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भास्कर जाधव यांच्या सोबत तसे राजकीय प्रतिस्पर्धी. पण मंत्रीपद मिळाल्यानंतर रत्नागिरीच्या पहिल्याच दौऱ्यात उदय सामंत यांनी थेट भास्कर जाधव यांची भेट घेतली.भास्कर जाधव यांच्या घरी जात जवळपास या दोन नेत्यांमध्ये ही अर्धातास भेट झाली.

मंत्रीपद न मिळाल्याने भास्कर जाधव हे नाराज आहेत. त्यामुळे उदय सामंत यांनी भास्कर जाधवांची घेतलेली ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सत्ताकेंद्रे आता उदय सामंत यांच्याकडे आली आहेत. त्यामुळे मंत्रीपदाची सुरुवात करताना उदय सामंत यांनी भास्कर जाधवांची भेट घेऊन आपण एकत्र काम करण्यासाठी पुढाकार घेतला. तर दुसरीकडे सामंत यांनी जाधव यांची नाराजी दूर करण्यासाठी ही भेट घेतली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.