दिवसभर इंग्रजी बोलतात, रात्री इंग्रजी पितात, भाजपा आमदाराचं विधान, ठाकरे बंधूंवर बोलताना काय म्हणाले?

भाजपाच्या आमदाराने ठाकरे गटावर मोठी टीका केली आहे. ठाकरे बंधूंची मुले कोणत्या माध्यमातून शिकली आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दिवसभर इंग्रजी बोलतात, रात्री इंग्रजी पितात, भाजपा आमदाराचं विधान, ठाकरे बंधूंवर बोलताना काय म्हणाले?
uddhav thackeray AND raj thackeray
| Updated on: Jun 29, 2025 | 5:18 PM

Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्य सरकराच्या इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्याच्या निर्णयाला विरोधकांकडून कडाडून विरोध केला जातोय. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या बंधूंनी तर थेट मैदानात उतरून सरकारच्या या निर्णयाला आव्हानच दिले आहे. येत्या 5 जुलै रोजी या हे दोन्ही नेते एकत्र येऊन मोर्चा काढणार आहेत. दरम्यान, सत्ताधारी भाजपाकडून मात्र आम्ही हिंदी विषयाची सक्ती केलेली नाही, असा दावा केला जातोय. याच प्रकरणावर बोलताना भाजपाचे आमदार परिणय फुके यांनी ठाकरे बंधूंवर खरपूस टीका केली आहे. दिवसा इंग्रजी बोलतात आणि रात्री इंग्रजी पितात असं परिणय फुके म्हणाले आहेत.

दोन्ही ठाकरे बंधूंची मुलं कोणत्या…

हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी विरोध सुरू केला असून 5 जुलै रोजी मोर्चादेखील काढण्यात येणार आहे. यावर परिणय फुके यांना विचारले असता म मराठीचा की महानगरपालिकेचा असा सवाल त्यांनी ठाकरे बंधूंना विचारला. तर जेव्हा निवडणूक येतात तेव्हा यांचा मराठी प्रेम जागृत होते, अशी टीका त्यांनी केली. दोन्ही ठाकरे बंधूंची मुलं कोणत्या माध्यमातून शिकले आहेत असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुढे बोलताना दिवसभर इंग्रजी बोलतात आणि रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी लोकांची दिशाभूल करतात असाही टोला यावेळी परिणय फुकेंनी लगावला.

भाऊ एकत्र येऊन काहीही होत नाही

आगामी महापालिकांच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरही परिणय फुके यांनी भाष्य केलंय. भाऊ एकत्र येऊन काहीही होत नाही, असा टोला त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना लगावला.

शासनाच्या निर्णयाची होळी

दरम्यान, आता परिणय फुके यांनी केलेल्या टीकेला मनसे आणि ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात 29 जुलै रोजी मुंबईत शासानाच्या हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी काँग्रेस, कम्यूनिष्ट तसेच इतर समविचारी पक्ष या आंदोलनात सहभागी झाले होते.