
मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवले आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. यामुळे आता दोन्ही गटाला नविन चिन्हाचा पर्याय शोधावा लागणार आहे. निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर आमदार रवी राणा हे एकनाथ शिंदे गटाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. आमदार रवी राणा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जबरदस्त ऑफर दिली आहे.
गरज पडल्यास एकनाथ शिंदे यांनी युवा स्वाभिमान पार्टी आणि पाना चिन्ह घ्यावे असे रवी राणा यांनी म्हंटले आहे. शिंदे गटाला लवकरात लवकरत चिन्हा बाबत निर्णय जाहीर करावा लागणार आहे.
शिवसेनेचे चिन्ह गोठवल्या नंतर आमदार रवी राणा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या युवा स्वाभिमान पार्टीचे चिन्ह वापरण्याची ऑफर दिली आहे. आमदार रवी राणा यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रवी राणा याआधीच शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे.