AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! रोहित पवार भाजपात येणार होते, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

आमदार रोहित पवार हे भाजपा नेत्यांच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा भाजपाचे नेते नितेश राणे यांनी केला आहे.

मोठी बातमी! रोहित पवार भाजपात येणार होते, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
rohit pawar
| Updated on: Jul 27, 2025 | 3:37 PM
Share

Rohit Pawar :  नितेश राणे हे भाजपा पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. ते नेहमीच हिंदुत्त्वाचा पुरस्कार करताना दिसतात. वेळोवेळी त्यांनी केलेल्या विधांनामुळं त्यांची नेहमीच चर्चा असते. कोकणात त्यांचे मोठे राजकीय प्रस्थ आहे. दरम्यान, त्यांनी आता एक मोठा आणि खळबळजन दावा केला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील नेते रोहित पवार हे 2019 सालीच भाजपात येणार होते, असा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

आमदार रोहित पवार हे 2019 सालीच भाजपात येणार होते, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. रोहित पवार हे मनाने भाजपात आहेत तर शरीराने शरद पवार यांच्यासोबत आहेत, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

रोहित पवार हे 2019 सालीच भाजपात येणार होते. ते कुठल्या वेळी कोणत्या भाजपाच्या नेत्यांना भेटात हे आम्ही बोलायला लागलो तर रोहित पवार यांनात तोंड वाचवायला जागा राहणार नाही. रोहित पवार हे मनाने भाजपात आहेत. शरीराने शरद पवार यांच्या पक्षात आहेत, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे.

रोहित पवारांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी

दरम्यान, रोहित पवार हे शरद पवार यांच्या पक्षातील तरुण आणि तडफदार नेते मानले जातात. भाजपा तसेच सत्ताधाऱ्यांवर त्यांनी वेळोवेळी टीकेचे आसूड ओढलेले आहेत. रोजगार, शिक्षण, शेती आदी क्षेत्रांतील प्रश्नांना घेऊन ते सरकारला घेरताना दिसतात. त्यांना नुकतेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. शशिकांत शिंदे यांची प्रदेशध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर रोहित पवार यांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदाची आणि पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेलच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली.

रोहित पवार नेमकं काय उत्तर देणार?

दरम्यान या नव्या जबाबदारीमुळे रोहित पवार यांचे त्यांच्या पक्षातील वजन वाढलेले आहे. असे असताना आता नितेश राणे यांनी त्यांच्याबाबत वरील दावा केला आहे. त्यामुळे आता राणे यांच्या दाव्यावर रोहित पवार नेमकं काय उत्तर देणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था