पर्यावरण मंत्री पत्री पुलासाठी दोनदा आले, नदी पात्रात सुरु असलेल्या आंदोलनाला एकदा तरी भेट द्या, मनसेची मागणी  

| Updated on: Feb 22, 2021 | 12:08 AM

या मुद्याकडे आज पुन्हा मनसे आमदार राजू पाटील यांनी लक्ष वेधले आहे. (Raju Patil Aditya Thackeray)

पर्यावरण मंत्री पत्री पुलासाठी दोनदा आले, नदी पात्रात सुरु असलेल्या आंदोलनाला एकदा तरी भेट द्या, मनसेची मागणी  
राजू पाटील, आदित्य ठाकरे
Follow us on

कल्याण : “प्रदूषण रोखण्यासाठी 11 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. लाखो नागरिकांच्या जिविताचा विषय आहे. पत्री पुलासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दोनदा कल्याणमध्ये आले. मात्र त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन मार्ग काढला पाहिजे ही विनंती, सरकारचे लक्ष नाही. कल्याण डोंबिवलीकरांवर कधी कृपादृष्टी होईल हे आम्हाला माहीत नाही,” असे विधान मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केले आहेत. (MNS MLA Raju Patil Demand Aditya Thackeray to Visit Ulhas River Pollution agitation)

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी नदी पात्रता आंदोलन सुरु केले आहे. नदी प्रदूषण रोखण्यावर जोर्पयत ठोस तोडगा काढला जात नाही. तोर्पयत आंदोलन मागे घेतले जाणार नाही या मुद्द्यावर निकम ठाम आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली.

नदी प्रदूषण रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनेत काहीही तथ्य नाही, असे वक्तव्य राजू पाटील यांनी केले. नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली होती. आंदोलनासाठी मनसेचा पाठिंबा दिला होता. या मुद्याकडे आज पुन्हा मनसे आमदार राजू पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

नदी प्रदूषणाचा मुद्दा हा पर्यावरणाशी संबंधित आहे. प्रदूषणप्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष द्यावे, याकडे राजू पाटील यांनी लक्ष वेधले आहे. आदित्य ठाकरे पत्री पूलासाठी कल्याणमध्ये दोनदा आले होते. त्यांनी कल्याणमध्ये येऊन नदी प्रदूषणाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : जितेंद्र आव्हाड यांचं ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण

वाशीममधील सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा