दाढी वाढवून कुणी मोदी होत नाही… भारत भ्रमण आहे की भ्रमित करणं? राहुल गांधींवर सणकून टीका….

आधी सोनिया गांधींच्या मागे उभं राहून राजकारण केलं आणि आता सीतामातेचा वापर करणं सुरु आहे, कुठे आहे तुमचा पुरुषार्थ? असा सवाल पूनम महाजन यांनी केला.

दाढी वाढवून कुणी मोदी होत नाही... भारत भ्रमण आहे की भ्रमित करणं? राहुल गांधींवर सणकून टीका....
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 12, 2022 | 9:51 AM

मुंबईः दाढी वाढवल्यामुळे कुणी नरेंद्र मोदी (Narendra Modi) होत नाही. त्यासाठी समर्पण आणि ताकद कमवावी लागते, असा टोला भाजप खासदार पूनम महाजन यांनी राहुल गांधी यांना लगालाय. राहुल गांधी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेतून भारत भ्रमण करतायत की लोकांना भ्रमित करतायत, अशी टीका त्यांनी केली. विलेपार्ले येथे भारतीय जनता पार्टीतर्फे (BJP) जागर मुंबईचा या मोहिमेअंतर्गत सभेत पूनम महाजन बोलत होत्या. या सभेत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिषे शालर, खासदार पूनम महाजन तसेच आमदार पराग अळवणी उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे महाराष्ट्र पिंजून काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबईतील विधानसभा मतदार संघात काल याच मालिकेअंतर्गत सभा घेण्यात आली.

यावेळी पूनम महाजन यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर टीका केली. स्वसमृद्धीसाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करत आहेत. ही तीच काँग्रेसची सत्ता आहे, २००७ मध्ये जेव्हा एएसआयने अभ्यास करून सुप्रीम कोर्टात रामसेतू हा ऐतिहासिक आहे, असा अहवाल दिला होता. त्याचा विरोध करण्यासाठी राहुल गांधी यांच्या सत्तेने, युपीएने तो अहवाल परत घेतला होता. राम-रामायण मनघडंत आहे…

आता निवडणुका आल्या की त्यांना राम आठवतो.. जिन को राम याद आता है.. वो विदेश मे आराम करता है… त्यांना फक्त हाच राम माहिती आहे, अशी टीका महाजन यांनी केली.

राहुल गांधी यांनी नेहमीच मातेच्या मागे उभं राहून राजकारण केलं. आधी सोनिया गांधींच्या मागे उभं राहून राजकारण केलं आणि आता सीतामातेचा वापर करणं सुरु आहे, कुठे आहे तुमचा पुरुषार्थ? असा सवाल पूनम महाजन यांनी केला.

त्यामुळे तुम्हाला तारक मेहता का उलटा चश्मा बघायची गरज नाही, इथंच राहुल गांधी यांचा उलटा दिमाग… पाहता येईल, असा टोमणा पूनम महाजन यांनी केली.