ठाकरे परिवाराचे 19 बंगले कुठे गेले? किरीट सोमय्यांचा पुन्हा हल्लाबोल, काय भूमिका?

आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या याप्रकरणी सक्रिय झाल्याचं दिसून येतंय. आज ते अलिबाग येथील सीईओंचा भेटणार आहेत.

ठाकरे परिवाराचे 19 बंगले कुठे गेले? किरीट सोमय्यांचा पुन्हा हल्लाबोल, काय भूमिका?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 12, 2022 | 9:35 AM

रायगड, अलिबागः  ठाकरे (Thackeray) परिवाराचे 19 बंगले कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी विचारला आहे. आज या मुद्द्यावरून सोमय्या पुन्हा एकदा हल्लाबोल करणार आहेत. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या कुटुंबीयांच्या संबंधित 19 बंगल्यांवरून रान उठवलं होतं. अलिबाग येथील बंगले रश्मी ठाकरे यांच्याशी संबंधित अन्वय नाईक यांनी 2009 मध्ये हे बंगले बांधले.2014 मध्ये ठाकरे कुटुंबीयांनी ते विकतली घेतले, मात्र आता हे बंगले गायब केले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.

किरीट सोमय्या या प्रकरणी आज अलिबाग येथील सीईओ यांना भेटणार आहे. यासंबंधीचं ट्विट त्यांनी केलंय.

काय आहे प्रकरण?

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनुसार, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अलिबाग येथील कोर्लई ग्रामपंचायतीतील 19 बंगले स्वतःच्या नावावर करण्यासाठी पत्र लिहिले होते. हे पत्रदेखील किरीट सोमय्या यांनी माध्यमांमध्ये शेअर केलं होतं.

त्यानंतर हे बंगले रश्मी ठाकरे यांच्या नावावर झाले 2020 मध्ये त्यांनी 19 बंगल्यांचा मालमत्ता करही भरल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे. एवढंच नाही तर त्यापूर्वीची दोन वर्षे रश्मी ठाकरे यांनी आणि त्याआधी सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईक यांनी भरल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

हे बंगले रश्मी ठाकरे यांच्यासंबंधित असतानाही ते आता दिसत नाहीत, ते गायब केले आहेत का, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केलाय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण जोरदारपणे लावून धरलं होतं.

त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं बंड तसंच शिंदे-भाजप सरकार आल्यानंतर यावरील आरोप-प्रत्यारोप शांत झाले होते. आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या यावरून सक्रिय झाल्याचं दिसून येतंय. आज ते अलिबाग येथील सीईओंचा भेटणार आहेत.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.