“मी जो काही आहे, ते माझे गुरु आदरणीय पवारसाहेबांमुळेच, आपणास गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा”

Jayant Patil on Sharad Pawar : गुरुपौर्णमेनिमित्त जयंत पाटील यांचं ट्विट; म्हणाले, साहेब मी तुमच्यामुळेच आहे...

मी जो काही आहे, ते माझे गुरु आदरणीय पवारसाहेबांमुळेच, आपणास गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
| Updated on: Jul 03, 2023 | 1:13 PM

मुंबई : आज गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक ट्विवट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून जयंत पाटलांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज मी जो काही आहे, ते माझे गुरु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळेच आहे. आदरणीय साहेबांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

भारताच्या संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचे मोठे महत्व आहे. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. ज्यांनी आपल्याला शिकवलं, घडविलं आणि ज्यांच्यामुळे आपण आज आहोत, त्यांना वंदन करण्याचा आजचा दिवस आहे, असंही ते म्हणालेत.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गुरुपौर्णमेनिमित्त अजित पवार यांनीही ट्विट केलं आहे. आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येणाऱ्या, व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणणाऱ्या, स्वप्नांच्या पंखांना बळ देणाऱ्या आणि एक आदर्श नागरिक आपण बनावं म्हणून आपल्यामध्ये सदाचारी विचारांची रुजवण करणाऱ्या तमाम गुरुजनांना ‘गुरुपौर्णिमा’निमित्त कोटी-कोटी प्रणाम! ‘गुरुपौर्णिमा’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!, असं अजित पवार म्हणालेत.

अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका काय असेल याबाबत चर्चा होत होती. त्यावेळी मी साहेबांबरोबर… असं म्हणत जयंत पाटील यांनी कालही एक फोटो शेअर केला होता.

अजित पवार यांनी काल उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या इतरही नेत्यांनी शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर छगन भुजबळ कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसंच दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनीही शपथ घेतली आहे.