BMC Election 2022 Mhada Colony Ward 27 : मागच्या वेळी सहज जिंकलेला वॉर्ड भाजप राखणार? वॉर्ड क्रमांक 27 ची राजकीय हवा कुठल्या दिशेने?

वॉर्ड क्रमांत 27 मध्ये (Mhada Colony Ward 27) गेल्या वेळी पंचरंगी लढत झाल्याने भाजपने सहज विजय प्राप्त केला होता. मात्र यावेळी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची ताकद ही भाजपपुढील प्रमुख आव्हान असणार आहे.

BMC Election 2022 Mhada Colony Ward 27 : मागच्या वेळी सहज जिंकलेला वॉर्ड भाजप राखणार? वॉर्ड क्रमांक 27 ची राजकीय हवा कुठल्या दिशेने?
मागच्या वेळी सहज जिंकलेला वॉर्ड भाजप राखणार?
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे

|

Jun 07, 2022 | 7:19 PM

मुंबई : गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election 2022) भाजपने सेनेला कडवी टक्कर देत काही काळ तरी घाम फोडला होता. मात्र तीन दशकं जुना गढ राखत सेने पुन्हा सत्ता काबीज केली. मात्र यावेळी भाजकडन जोरदार तयारी करण्यात आलीय. त्यामुळे यंदाची निवडणुकी शिवसेनेसाठीही (Shivsena) सोपी नसणार आहे. येत्या निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र लढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसेच महाविकास आघाडीची अंतर्गत धुसफूसही डोकेदुखी वाढवत आहेत. अशा वॉर्ड क्रमांत 27 मध्ये (Mhada Colony Ward 27) गेल्या वेळी पंचरंगी लढत झाल्याने भाजपने सहज विजय प्राप्त केला होता. मात्र यावेळी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची ताकद ही भाजपपुढील प्रमुख आव्हान असणार आहे. तसेच राज्याच्या राजकारणतही मुख्यमंत्रिपदामुळे शिवसेनेचा दबदबा वाढला आहे.

गेल्या निवडणुकीत कुणाला किती मतं?

या वॉर्डमध्ये सर्वात जास्त मतं ही सुरेखा मनोजकुमार पाटील यांना मिळाली होती. 7347 मतं मिळवत त्यांनी सहज विजय प्राप्त केला होती. तर शिवसेनच्या उमेदवाराला 4 हजारांच्या असापास म्हणजेच 4098 मतं मिळाली होती. तर गेल्या निवडणुकीत या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारालाही चांगली मतं मिळाली होती. काँग्रेसच्या प्रियंका यादव यांना 3 हजारांपेक्षाही जास्त मतं मिळाली होती. त्यामुळे सेना आणि काँग्रेसची मतं यावेळी जोडली गेली तर भाजपला नक्कीच घाम फुटला असता. मात्र शिवसेना आणि काँग्रेस हे वेगवेगळे लढल्याने भाजपचा या ठिकाणी सहज विजय झाला होता. मनसेला मात्र या ठिकाणी फार काही मतं मिळाली नव्हती, मनसची गाडी 700 ते आठशे मतांच्या मध्येच अडकली होती.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

कोरोनाकाळात अनेक मुद्दे गाजले

इतर मतदारसंघाच्या मानाने हा मतदारसंघ एवढा मोठा नसला तरी हा अत्यंत महत्वाचा वॉर्ड मानला जातो. ही निवडणुक स्थानिक वॉर्ड पातळीवरही चुरशीची आहे. कारण स्थानिक लेव्हलची निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते. गेल्या तीन दशकांपासून महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र यावेळी शिवसेनेला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजप पूर्णपणे जोर लावत निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपने ऐन निवडणुकीआधी आणि यंदाच्या पावसाळ्याआधी मुंबईत पोलखोल यात्र काढत शिवसेनेवर चौफेल हल्ला चढवला आहे. त्यामुळे त्याचाही फायदा भाजपला या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. तसेच सुरेखा पाटील यांनी कोरोनाकाळात त्यांच्या वॉर्डमध्ये ऑक्सिजनच्या तुटड्यापासून ते इतर विविध मुद्द्यांवरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला होता.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें