नंदुरबार ZP सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी संजय राऊत मैदानात

| Updated on: Jan 09, 2020 | 2:42 PM

मुंबईत संजय राऊत आणि काँग्रेस नेते, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी हे नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी बैठक घेण्याची शक्यता आहे.

नंदुरबार ZP सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी संजय राऊत मैदानात
Follow us on

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत मैदानात (Nandurbar ZP Sanjay Raut) उतरणार आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळे नंदुरबार झेडपीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी संजय राऊत यांनी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत संजय राऊत आणि काँग्रेस नेते, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी हे नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी आज बैठक घेण्याची शक्यता आहे.

कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी दोन्ही पक्षश्रेष्ठींचे प्रयत्न आहेत. आधीच धुळे वगळता सहापैकी एकाही जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला यश आलेलं नाही. अशा परिस्थितीत नंदुरबारमध्ये त्रिशंकू परिस्थिती असल्याने भाजप झेंडा फडकवण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न करतील. त्याआधीच राऊत-पाडवींनी कंबर कसली आहे.

के. सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा तोरणमाळ गटातून निसटता पराभव झाला आहे. गट गेला असला, तरी नंदुरबारचा गड जिंकण्यासाठी पाडवी आटोकाट प्रयत्न करतील.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 23 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर भाजपही 23 जागांवर विजयी झाली आहे. शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी तीन जागांसह चौथ्या क्रमांकावर आहे. शिवसेनेची भूमिका (Nandurbar ZP Sanjay Raut) निर्णायक ठरणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी नवापूर तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली होती. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सत्तानाट्यात राष्ट्रवादी भाजपसोबतच राहील असे संकेत दिले जात आहेत. त्यामुळेच शिवसेना-काँग्रेस हातमिळवणी करत भाजपचा मेरु रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

जिल्हा परिषदेतील विजयी जागा

  • काँग्रेस : 23
  • भाजपा : 23
  • शिवसेना : 7
  • राष्ट्रवादी : 3

नंदुरबार जिल्ह्यातील 6 पंचायत समितीचे निकाल

  • काँग्रेस – नवापूर(सत्ता कायम), अक्कलकुवा (सत्ता कायम)
  • भाजप – नंदुरबार, शहादा
  • शिवसेना – धडगाव
  • राष्ट्रवादी – 00
  • तळोदा पंचायत समितीच्या काँग्रेस – भाजपला प्रत्येकी पाच जागा

(Nandurbar ZP Sanjay Raut)