फडणवीसांना महाराष्ट्रात खूप कामे, मी मोकळाच; संजय राऊत, कधी येता कर्नाटकला? : नारायण राणे

| Updated on: Aug 10, 2020 | 11:31 AM

सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतच हे महाराष्ट्रातील सरकार राहील, तीन पक्षात एकमत नसल्याने हे सरकार चालणार नाही, असे भाकित नारायण राणेंनी वर्तवले.

फडणवीसांना महाराष्ट्रात खूप कामे, मी मोकळाच; संजय राऊत, कधी येता कर्नाटकला? : नारायण राणे
Follow us on

सिंधुदुर्ग : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात खूप कामे आहेत. मी मोकळा आहे, कधी येता कर्नाटकला सांगा? अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना उत्तर दिले आहे. “वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, पण ते यायला तयार आहेत का?” असा सवाल राऊतांनी विचारला होता. (Narayan Rane challenges Sanjay Raut on Belgaum Chhatrapati Shivaji Maharaj Statue)

देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात खूप कामे आहेत. मी मोकळा आहे, कधी येता कर्नाटकाला सांगा? असा सवाल राणेंनी विचारला. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय चालू आहे, असा दावाही नारायण राणे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना केला.

सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतच हे महाराष्ट्रातील सरकार राहील, असा दावा नारायण राणेंनी केला. तीन पक्षात एकमत नसल्याने हे सरकार चालणार नाही, असे भाकित त्यांनी वर्तवले.

संजय राऊत काय म्हणाले?

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगावातून रात्रीच्या अंधारात पोलिसांनी ज्या पद्धतीने हटवला, त्याचा धिक्कार करावा तेवढा कमी. त्याविषयी विरोधीपक्ष बोलायला तयार नाही. चार दिवसांपूर्वी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांचंच सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये रात्रीच्या वेळी, दिवे बंद करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला जातो, हे कसले लक्षण?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला होता.

हेही वाचा : बाप-बेटे घरी बसून, मंत्रालय ओसाड, पार्ट्यांना जातात, कॅबिनेटला नाही, नारायण राणेंचा निशाणा

“महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची दखल घ्यावी. राजकारण न करता या राज्यातल्या विरोधीपक्षाच्या प्रमुखांना म्हणजेच विरोधीपक्ष नेत्यांना विश्वासात घ्यावं. वेळ पडली तर त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे बेळगावात जाऊन आंदोलन करायला तयार आहोत.
ते यायला तयार आहेत का विचारा” असेही राऊत म्हणाले होते. (Narayan Rane challenges Sanjay Raut on Belgaum Chhatrapati Shivaji Maharaj Statue)

आशिष शेलार यांचा प्रतिप्रश्न

“या सगळ्या मागे स्थानिक कॉंग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी घेतलेली भूमिका ही थेट आहे, पुतळा हटवण्याची आहे. कॉंग्रेसचे प्रभारी अध्यक्ष असलेल्या जारकीहोळी यांच्याविरोधात संजय राऊत तुम्ही आणि शिवसेना आंदोलन करणार का? हा सवाल आमचा तुम्हाला आहे.” असे भाजप नेते आशिष शेलार म्हणाले होते.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“आंदोलन छत्रपतींसाठी करावं लागलं, तर परवानगीची गरज काय? शिवसेनेला विरोधीपक्ष नेता आणि भाजपच्या परवानगीची गरजच का लागते, या प्रश्नाचे उत्तरही तुम्हालाच द्यावे लागेल. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्याच ठिकाणी आणि सन्मानाने जसा तहसीलदार आणि पोलीस पाटलांनी सांगितलं, त्याच पद्धतीने झाला पाहिजे. कर्नाटकच्या सरकारला आमची विनंती आहे. शिवसेनेने आंदोलन जरुर करावं, काँग्रेसच्या विरोधात करणार की नाही, याचं उत्तर द्यावं” अशा शब्दात आशिष शेलार यांनी निशाणा साधला होता.

संबंधित बातम्या :

वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, ते यायला तयार आहेत का? : संजय राऊत

“संजय राऊत, काँग्रेसविरुद्ध तुम्ही आणि शिवसेना आंदोलन करणार का?” पुतळा वादावर आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर

राणेंना कामधंदा उरला नाही, घरी एक बोलतात, बाहेर वेगळेच : गुलाबराव पाटील

(Narayan Rane challenges Sanjay Raut on Belgaum Chhatrapati Shivaji Maharaj Statue)