वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, ते यायला तयार आहेत का? : संजय राऊत

"अयोध्येत नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांचंच सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये शिवरायांचा पुतळा हटवला जातो, हे कसले लक्षण?" असा सवाल संजय राऊत यांनी विचारला

वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, ते यायला तयार आहेत का? : संजय राऊत

मुंबई : बेळगाव जिल्हयातील मनगुत्ती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्यानंतर सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. “महाराष्ट्र सरकारने राजकारण न करता विरोधीपक्ष नेत्यांना विश्वासात घ्यावं. वेळ पडली तर त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे बेळगावात जाऊन आंदोलन करायला तयार आहोत. ते यायला तयार आहेत का विचारा” अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली. (Shivsena MP Sanjay Raut on Chhatrapati Shivaji Maharaj Statue removed in Belgaum)

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगावातून रात्रीच्या अंधारात पोलिसांनी ज्या पद्धतीने हटवला, त्याचा धिक्कार करावा तेवढा कमी. त्याविषयी विरोधीपक्ष बोलायला तयार नाही. चार दिवसांपूर्वी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांचंच सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये रात्रीच्या वेळी, दिवे बंद करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला जातो, हे कसले लक्षण?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

हेही वाचा : बेळगावात शिवरायांचा पुतळा रातोरात हटवला, कन्नडीगांचं संतापजनक कृत्य

“महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची दखल घ्यावी. राजकारण न करता या राज्यातल्या विरोधीपक्षाच्या प्रमुखांना म्हणजेच विरोधीपक्ष नेत्यांना विश्वासात घ्यावं. वेळ पडली तर त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे बेळगावात जाऊन आंदोलन करायला तयार आहोत.
ते यायला तयार आहेत का विचारा” असेही राऊत म्हणाले.

“सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन राजकारण”

“अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन राजकारण केले जात आहे. बिहार सरकार आणि दिल्ली हे महाराष्ट्र सरकारच्या विरोधात षडयंत्र रचत आहेत. मात्र मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यांनी आतापर्यंत मोठमोठे तपास केले आहेत. सत्य समोर आणण्याचे प्रयत्न सुरु असताना काही जण पडद्यामागे राहून स्वतःचा स्क्रीनप्ले लिहित आहेत. बिहारमधील काही राजकीय नेते आणि महाराष्ट्राच्या नेत्यांची यात हातमिळवणी झाल्याचं वाटतं, उद्देश हा की यातील सत्य, रहस्य लपवले जावे” असा आरोप संजय राऊत यांनी केला. (Shivsena MP Sanjay Raut on Chhatrapati Shivaji Maharaj Statue removed in Belgaum)

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“सीबीआयच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्र सरकावर निशाणा साधला जात आहे. मात्र कितीही चक्रव्यूह रचा, आम्ही भेदून बाहेर येऊ. सुशांतच्या मृत्यूच्या 50 दिवसानंतर अचानक राजकारण सुरु झालं. त्यामागे कोण आहे? बिहारच्या डीजीपीचे चरित्र बघा. ते एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. निवडणुकीत ते भाजप उमेदवार होते. निवृत्तीनंतर त्यांना भाजप-जेडीयूकडून निवडणूक लढावयाची आहे. अशी मानसिकता असलेल्या वरिष्ठ नेतृत्वाखालील पोलीस दलाकडून काय अपेक्षा ठेवायच्या? आम्ही सर्वच पोलिसांचा आदर करतो, मात्र तुम्ही खाकी वर्दी घालून खुलेआम असे वर्तन करत असाल, तर चालणार नाही” असा इशारा संजय राऊत यांनी दिला

“सुशांत किती वेळा वडिलांना भेटायला बिहारला गेला होता? मला त्याच्या वडिलांविषयी आदर आणि सद्भावना आहेत. मात्र त्यांचे संबंध ठीक नसल्याची माझ्याकडे माहिती आहे. काही गोष्टी तपासात समोर येतील” असेही राऊत म्हणाले.

पाहा व्हिडिओ :

(Shivsena MP Sanjay Raut on Chhatrapati Shivaji Maharaj Statue removed in Belgaum)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *