राणे म्हणतात, तो क्रिमिनल ऑफेन्स नाही, पत्रकारांवरच उलटे भडकले, नेमकं काय झालं?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन पोलीस आयुक्तांनी त्यांच्या अटकेचे आदेश दिले. या आदेशावरुन नारायण राणेंनी माध्यमांवरच आगपाखड केलेली पाहायला मिळाली.

राणे म्हणतात, तो क्रिमिनल ऑफेन्स नाही, पत्रकारांवरच उलटे भडकले, नेमकं काय झालं?
केंद्रीय मंत्री नारायण राणे
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 11:16 AM

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन पोलीस आयुक्तांनी त्यांच्या अटकेचे आदेश दिले. या आदेशावरुन नारायण राणेंनी माध्यमांवरच आगपाखड केलेली पाहायला मिळाली. मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा आणि मग टीव्हीवर दाखवा, नाही तर चॅनलविरोधात माझी केस दाखल होईल, अशी खुली धमकी राणेंनी पत्रकार परिषदेत दिली. ते जन आशीर्वाद यात्रे दरम्यान चिपळूनमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

विशेष म्हणजे राज्यात राणेंविरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झालेत. यातील एक गुन्हा नाशिकमध्ये दाखल आहे. त्या आधारेच नाशिक पोलीस आयुक्तांनी राणेंच्या अटकेचे आदेश दिले आहेत. याबाबत त्यांनी माध्यमांनाही माहिती दिलीय. मात्र, राणेंकडून हे मान्य करण्यास नकार येताना दिसतोय.

नारायण राणे काय म्हणाले?

नारायण राणे म्हणाले, “माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची मला माहिती नाही. मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा आणि मग टीव्हीवर दाखवा, नाही तर चॅनलविरोधात माझी केस दाखल होईल. गुन्हा नसताना पथक निघालंय, अटक होणार असं म्हणत आहेत. मी काय नॉर्मल माणूस वाटलो आहे का? कुणाचंही नाव घेऊन माझी बदनामी करायला घेतली तर त्यांच्याआधी माझा गुन्हा तुमच्याविरोधात सुरू होईल. कालपासून टीव्ही चॅनल सारखं हेच दाखवत आहेत.”

“उद्धव ठाकरे म्हणाले थोबाड फोडू, हा क्राईम नाही का? त्यावेळी का गुन्हा नाही?”

“मी बातमीवर विश्वास ठेवणार नाही. मला माहिती मिळाल्यावर आम्ही समर्थ आहोत. दगड मारुन जाणं हा पुरुषार्थ नाही. आम्ही पाहू, काय पुरुषार्थ आहे. ज्यावेळेला शिवसेना भवन फोडू असं लाड म्हणाल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले थोबाड फोडू, हा क्राईम नाही का? त्यावेळी का गुन्हा नाही?” असा सवाल नारायण राणेंनी विचारला.

15 ऑगस्ट हा वर्धापन दिन हा माहिती नाही मुख्यमंत्री असताना, मी म्हणालो त्याने मागे सेक्रेटरीला विचारावं. आणि त्यावेळी मी असतो तर.. असतो तर हा क्राईम नाही. मी आता कानफाड फोडीन हा क्राईम आहे. मी पण कॅबिनेट मंत्री आहे देशाचा. देशाचा अमृत महोत्सव माहिती नाही हा राष्ट्रद्रोह आहे, असा घणाघात नारायण राणेंनी केला.

“पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान?”

आम्ही नागरिक आहोत, बॅनरबाजी करु. मी तुम्हाला मीडियाला उत्तर देण्यास बांधिल नाही. कोण शिवसेना, समोर उभं तरी राहावं.. नाशिक पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे आदेश काढायला. मी बोललो ते क्रिमिनल ऑफेन्स नाहीच. तपासून पाहावं. आमचं पण सरकार वर आहे, बघतो हे किती उड्या मारतात ते. ठरल्याप्रमाणे यात्रा होणार, असंही राणेंनी स्पष्ट केलं.

“नारायण राणेने शिवसेना सोडली, तेव्हाच…”

आम्ही भीक घालत नाही असल्या शिवसैनिकांना. कोण आहेत समोर उभं तरी राहावं, मी नाही जुमानत त्यांना, ते आक्रमक झाले तर आम्ही डबल आक्रमक होऊ. आज ऑफिस तोडलं, उद्या आमच्या घरापर्यंत पोहोचले तर, नारायण राणेने शिवसेना सोडली, तेव्हाच शिवसेना गेली, असंही नारायण राणे म्हणाले.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

संबंधित बातम्या :

राणेंमुळे भाजपची गोची? चंद्रकांत पाटील म्हणतात, राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही!

राणे म्हणाले, तुम्ही राष्ट्रपती की पंतप्रधान, आता नाशिक पोलीस आयुक्त म्हणतात, ते कोर्टात सांगा!

कॅबिनेट मंत्री असताना राणेंना अटक होऊ शकते का? काय होणार, नाशिकचे पोलीस आयुक्तांचं सविस्तर स्पष्टीकरण

संबंधित व्हिडीओ पाहा :

Narayan Rane threat Journalist media channels in Chiplun Ratnagiri

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.