नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, पहिला उमेदवारही जाहीर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:26 PM

मुंबई : युतीची चर्चा पुढे सरकल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी स्वबळाचा नारा दिलाय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे निवडणूक लढणार आहेत. मुंबईत राणेंच्या पक्षाचा पहिला मेळावा झाला. या मेळाव्यात त्यांनी पहिला उमेदवारही जाहीर केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीकडूनही नारायण राणेंना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु होते. […]

नारायण राणेंचा स्वबळाचा नारा, पहिला उमेदवारही जाहीर
Follow us on

मुंबई : युतीची चर्चा पुढे सरकल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी स्वबळाचा नारा दिलाय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे निवडणूक लढणार आहेत. मुंबईत राणेंच्या पक्षाचा पहिला मेळावा झाला. या मेळाव्यात त्यांनी पहिला उमेदवारही जाहीर केला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीकडूनही नारायण राणेंना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु होते. पण नारायण राणेंनी कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती. युती झाल्यास नारायण राणेंची अडचण होऊ शकते. कारण, रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे आणि ही जागा शिवसेनेने 2014 ला मोठ्या फरकाने जिंकली होती.

नारायण राणे हे सध्या भाजपच्या पाठिंब्याने राज्यसभा खासदार आहेत. त्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर नव्या पक्षाची स्थापना केली होती. त्यांच्या पक्षाकडून राज्यात कुठे कुठे आणि किती उमेदवार दिले जाणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण त्यांच्या मुलाची उमेदवारी पहिल्यांदाच जाहीर करण्यात आल्यामुळे नारायण राणे आता पुन्हा एकदा शिवसेनेसमोर उभे राहणार असल्याचं स्पष्ट झालं.

वाचारत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा : निलेश राणे, विनायक राऊत, की सुरेश प्रभू?