…म्हणून आदित्य ठाकरे ठाण्यात आले नाहीत; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात दिवाळी दणक्यात साजरी करण्यात येत आहे.

...म्हणून आदित्य ठाकरे ठाण्यात आले नाहीत; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची टीका
Image Credit source: social media
| Updated on: Oct 24, 2022 | 5:01 PM

ठाणे : दिवाळी सणाच्या निमित्ताने राज्यात राजकीय धमाके पहायला मिळत आहेत. दिवाळी सणाच्या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात दिवाळी दणक्यात साजरी करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे आमदार तथा युवा सेना अध्यक्ष दिवाळी कार्यक्रमानिमित्ताने ठाण्यात येणार होते. तसे होर्डिंगही लागले होते. मात्र, आदित्य ठाकरे ठाण्यात आले नाहीत. यावरुनच शिंदे गटातील नेत्यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

ठाणे शहरात ठिकठिकाणी नरकचतुर्दशीच्या निमित्ताने दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले. मात्र, आदित्य ठाकरे देखील ठाकरे गटाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणार होते. मात्र, आदित्य ठाकरे आले नाहीत. आदित्य ठाकरे ठाण्यात का आले नाहीत याची खमंग चर्चा ठाणे शहरात सुरू आहे.

शिल्लक सेनेने देखील आजच्या दिवशी एका ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला शिल्लक सेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे येणार असे होर्डिंग्ज ठाणे शहरात जागोजागी लावण्यात आले होते मात्र, प्रतिसाद कमी मिळेल या भितीने ते आले नाहीत असा टोला शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी लगावला आहे.

तलावपाळी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांना तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला.

मुख्यमंत्र्यांना मिळाला तेवढा प्रतिसाद आपल्याला ठाण्यात आल्यावर मिळेल की नाही याची खात्री वाटत नसल्यानेच त्यांनी आज ठाण्यात येणे टाळले असावे असा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

ठाण्यात पार पडलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात जमलेली गर्दी ही निष्ठावंत शिवसैनिकांचीच होती. फक्त त्यांची निष्ठा बाळासाहेबांची हिंदुत्व जपणारी खरी शिवसेना आहे.

जे लोक स्वतःला हिंदुत्व वादी म्हणतात आणि पण हिंदूंत्वाला विरोध करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्या सोबत सर्वसामान्य जनता नसते असेही मस्के म्हणाले.