AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिपॉझिट भरण्यासाठी 10 हजारांची चिल्लर आणली, मोजेपर्यंत अर्ज भरण्याची वेळ संपली

नाशिक : लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी आज शेवटची तारीख असल्याने नाशिकमध्ये अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्याही बरीच होती. मात्र अपक्ष उमेदवार मंगेश ढगे आणि शिवाजी वाघ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले असताना त्यांनी अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या 25 हजार रक्कमेपैकी मंगेश ढगे यांनी 25 हजार, तर शिवाजी वाघ यांनी […]

डिपॉझिट भरण्यासाठी 10 हजारांची चिल्लर आणली, मोजेपर्यंत अर्ज भरण्याची वेळ संपली
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

नाशिक : लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी आज शेवटची तारीख असल्याने नाशिकमध्ये अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्याही बरीच होती. मात्र अपक्ष उमेदवार मंगेश ढगे आणि शिवाजी वाघ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले असताना त्यांनी अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या 25 हजार रक्कमेपैकी मंगेश ढगे यांनी 25 हजार, तर शिवाजी वाघ यांनी 10 हजार रुपयांची चिल्लर आणली.

वाघ यांनी एक रुपयाचे 1900 नाणे आणले होते. दोन रुपयाचे 1450, तर पाच रुपयांचे 640 आणि दहा रुपयाचे 200 नाणे त्यांनी आणले. असे एकूण दहा हजार रुपयाची चिल्लर त्यांनी आणली होती. यामुळे हे उमेदवार चर्चेत आले. तर काही रक्कम ही रोख स्वरूपात आणली होती. ही सर्व चिल्लर पाहून अधिकारीही चक्रावून गेले आणि ही सर्व रक्कम मोजून आमच्याकडे द्या असे अधिकाऱ्यांनी उमेदवारांना सांगितले.

उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून ही सर्व रक्कम मोजून घेतली आणि पुढील प्रक्रिया सुरू केली. मात्र ही प्रक्रिया झाल्यानंतर रक्कम देण्याच्या वेळी अधिकाऱ्यांनी वेळ संपल्याचं कारण समोर करत डिपॉझिट घेण्यास नकार दिला. यानंतर या उमेदवारांनी अधिकाऱ्यांसोबतच हुज्जत घातली.

रक्कम घेतली जाणार नाही असं उमेदवारांना सांगण्यात आलं. मात्र, “आम्ही तर लवकर आपल्या दालनात आलो होतो आणि सर्व प्रक्रियेस आपणच वेळ लावला. याबद्दल आपल्याला माहितीही दिली होती, तरीही तुम्ही आमची रक्कम का स्वीकारत नाही..आमची चूक नाही, आपण कर्मचारीही रक्कम मोजण्यासाठी दिले नाही आणि वेळ लागला तर आपण नकार देताय, असं करू नका,” अशी विनवणी उमेदवारांनी अधिकाऱ्यांकडे केली. मात्र वेळ संपल्यामुळे आम्ही घेणार नाही असा पवित्राच अधिकाऱ्यांनी घेतला. यामुळे निराश होऊन उमेदवारांनी आमच्यावर अन्याय होतोय, असं स्पष्ट शब्दात सांगितलं.

आपल्या कोणत्याही नियमात लिहिलेलं नाही की सुट्टी रक्कम घेतली जाणार नाही, असं असतानाही आमच्यावर असं बंधन लादत आमचे डिपॉझिट न घेणे म्हणजे हे जाणून बुजूनच केलं जातं आहे, असा आरोप शिवाजी वाघ यांनी केला. शिवाजी वाघ हे लाँड्रीचा व्यवसाय करतात, त्यामुळे आपल्याकडे सुट्टी रक्कम होती आणि मी त्यामुळे ती घेऊन आलो. फॉर्म भरण्याचा मलाही अधिकार आहे. तरीही अधिकारी असे करत असतील तर हे षडयंत्रच असल्याचा आरोप उमेदवारांनी केला. आमचं डिपॉझिट घेतलं नाही म्हणचे आमचा अर्जही बाद करणार हे निश्चित आहे. मात्र आम्ही आता न्यायलयात जाऊन दाद मागणार आहोत, म्हणजे एकमेव कारण फक्त आमची सुट्टी रक्कम जर ठरत असेल तर आमच्यावर अन्याय का असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल